मुंबई, 08 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सॅलिअन आत्महत्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. दिशा सालिनने साजरी केलेल्या शेवटच्या पार्टीचा व्हिडिओ समोर आला आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 8 जूनला ही पार्टी झाली होती. या पार्टीनंतर दिशाने आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या एक तासा आधीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये दिशा आणि तिचे मित्र काश्मिर सिनेमातील गाण्यावर नाचत आहे. दिशाही मनमुरादपणे डान्स करत आहे. दिशानेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सअॅपवर शेअर केला होता.
तर दुसरीकडे दिशाने आत्महत्या केली होती. त्यानंतर तिचा पोस्टमार्टेम अहवाल समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आता आणखी वाढला आहे.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील तपासाला सुशांतचे वडील केके सिंह (KK Singh) यांनी FIR दाखल केल्यानंतर एक वेगळे वळण मिळाले होते. सिंह यांनी पाटणा पोलिसांत रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात FIR दाखल केली. त्यांनी या FIR मध्ये केलेल्या आरोपानुसार रियाने सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपये काढले.
दरम्यान News18 ला मिळालेल्या ईडीच्या सूत्रांनुसार, ईडीला अद्याप रियाच्या खात्यामध्ये 15 कोटी रुपये मिळाले नाही आहेत. ईडीच्या सूत्रांचे असे म्हणणे आहे की, याचा अर्थ असा होतो की सुशांतच्या खात्यातून पैसे आणखी कुठेतरी ट्रान्सफर झाले आहेत. दरम्यान आता हे 15 कोटी रुपये कुणाच्या खात्यामध्ये वळवण्यात आले, असा सवाल कायम आहे. सुशांतचे ज्या ज्या बँकांमध्ये खाते आहे, त्या बँकांच्या कर्मचाऱ्यांशी ईडी बातचीत करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.