Dil Bechara Trailer: सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचा ट्रेलर आज येणार, चित्रपट 'ब्लॉकबस्टर' करण्याचा चाहत्यांचा मानस

Dil Bechara Trailer: सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचा ट्रेलर आज येणार, चित्रपट 'ब्लॉकबस्टर' करण्याचा चाहत्यांचा मानस

सुशांत सिंह राजपूतच्या अनेक आठवणी असणारा त्याचा शेवटचा सिनेमा दिल बेचारा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 06 जुलै : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या जाण्याचे दु:ख तर आहेच, पण त्याने त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून अनेक आठवणींचा ठेवा तो मागे ठेवून गेला आहे. दरम्यान सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा' (Dil Bechara) लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर अनेकांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुशांतच्या चित्रपटाबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्मात्यांनी अशी घोषणा केली होती की, या चित्रपटाचा ट्रेलर 06 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आज सकाळपासून चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाची त्याचे चाहते वाट पाहत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचे हॅशटॅग ट्रेंड देखील करत आहेत. दरम्यान या चित्रपटामध्ये सुशांत सिंह राजपूतबरोबर संजना सांघी (Sanjana Sanghi) हा नवा चेहरा दिसणार आहे.

ट्विटरवर अनेक लोकं #DilBecharaTrailer हा हॅशटॅग वापरून या सिनेमाला पाठिंबा दर्शवत आहेत. सुशांतच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीच इतकी क्रेझ पाहायला मिळत आहे. दरम्यान काहींनी या चित्रपटाच्या ट्रेलरला 100 मिलियन views मिळवून देण्याबाबत देखील भाष्य केले आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर करण्याचा सुशांतच्या चाहत्यांचा मानस आहे. त्याचप्रमाणे सुशांतचा 'दिल बेचारा' रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करेल असा विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी जेव्हा 'दिल बेचारा' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल अशी घोषणा करण्यात आली होती, त्यावेळी सुशांतच्या चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती. अनेकांनी सोशल मीडियावर अशी मागणी केली होती की, हा चित्रपट सिनेमा गृहातच प्रदर्शित केला जावा. 24 जुलै रोजी हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: July 6, 2020, 9:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading