'दिल बेचारा'चे टायटल ट्रॅक प्रदर्शित, हे गाणं ठरणार सुशांतचा शेवटचा डान्स परफॉर्मन्स

'दिल बेचारा'चे टायटल ट्रॅक प्रदर्शित, हे गाणं ठरणार सुशांतचा शेवटचा डान्स परफॉर्मन्स

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) च्या दिल बेचारा या सिनेमाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. हा सिनेमा 24 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे टायटल ट्रॅक आज प्रदर्शित झाले आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) च्या दिल बेचारा या सिनेमाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. हा सिनेमा 24 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान ए आर रेहमानने संगीतबद्ध केलेले 'दिल बेचारा' हे चित्रपटातील गाणं आज प्रदर्शित झाले आहे. दिल बेचारा या सिनेमामध्ये सुशांतबरोबर 'संजना सांघी' (Sanjana Sanghi)  हा नवा चेहरा दिसणार आहे. दिग्दर्शक आणि कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा (Mukesh Chabra)  यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनीच कास्टिंग डायरेक्टर म्हणून सुशांतला 'काय पो छे' या चित्रपटात हिरो म्हणून संधी दिली होती, हा सुशांतचा पहिला चित्रपट. तर दिल बेचारा हा मुकेश छाबरा यांनी दिग्दर्शित केलेला सुशांतचा शेवटचा चित्रपट. 24 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर (Disney Hotstar ) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

(हे वाचा-स्वत:च्याच घरात अभिनेत्रीचा बलात्कार, आरोपीकडून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी)

'दिल बेचारा' चित्रपटाचा ट्रेलर 06 जुलै रोजी प्रदर्शित झाला आणि या ट्रेलरने लाखो views मिळवले होते. दरम्यान आज सुशांतच्या या शेवटच्या चित्रपटातील गाणं आज प्रदर्शित झाले आहे. 'दिल बेचारा' या सिनेमाचे ते टायटल ट्रॅक आहे. या गाण्याला काही तासातच कमालीचा रिस्पॉन्स त्याच्या चाहत्यांकडून मिळत आहे. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर देखील हे गाणे शेअर करण्यात आले आहे.

.

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए. आर रेहमान यांनी हे गाणे संगीतबद्ध केले असून त्यांनीच हे गाणे गायले आहे. दरम्यान अमिताभ भट्टाचार्य  यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहे. एका कॉलेज फंक्शनमध्ये कमालीच्या एनर्जीने डान्स करताना सुशांत यामध्ये दिसत आहे. तर या गाण्याला असणारा 'रेहमान टच' नक्कीच सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.

डान्स आणि अभिनयावर अतोनात प्रेम करणाऱ्या सुशांतचा हा शेवटचा परफॉरमन्स असणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा दिल बेचारा हा सिनेमा ब्लॉकबस्टर करण्याचा मानस आहे. अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया त्याच्या फॅन्सनी शेअर केल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक सेलिब्रिटींनी देखील 'दिल बेचारा'च्या पोस्ट सोशल मीडियावर केल्या आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 10, 2020, 1:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading