Home /News /entertainment /

सुशांतचा शेवटचा चित्रपट Dil Bechara रिलीज; मनाला चटका लावणारी मॅनीची एक्झिट

सुशांतचा शेवटचा चित्रपट Dil Bechara रिलीज; मनाला चटका लावणारी मॅनीची एक्झिट

दिल बेचारा (dil bechara) पाहून सुशांतच्या आठवणीत प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल.

    मुंबई, 24 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूनंतर त्याच्या शेवटच्या चित्रपटाची प्रतीक्षा प्रत्येकाला होती आणि अखेर तो दिवस आला. सुशांतचा दिल बेचारा (dil bechara) चित्रपट डिज्नी प्लस हॉट स्टारवर रिलीज झाला. सुशांतच्या आत्महत्येला एक महिना होऊन गेला तरी त्या धक्क्यातून लोक अजून सावरले नाहीत. त्यात या शेवटच्या चित्रपटातही सुशांत म्हणजे मॅनीने घेतलेली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. अनेकांना आपल्या अश्रूंना आवर घालता आला नाही. स्वत: गंभीर आजाराने ग्रस्त असतानाही आनंदाने आयुष्य जगत गंभीर आजाराने ग्रस्त दुसऱ्या व्यक्तीलाही जगायला शिकवणाऱ्या मॅनीची ही कहाणी. किझी बासू म्हणजे संजना सांघी कॅन्सरशी लढत असते. तिच्या आयुष्यात डान्सर इम्मानुअल राजकुमार ज्युनिअर उर्फ मॅनी म्हणजेच सुशांतची एंट्री होते. किझी गंभीर आणि शांत तर सुशांत हसमुख आणि बिनधास्त भूमिकेत आहे. किझीचं दु:ख कमी करण्यासाठी मॅनी शक्य ते सर्व प्रयत्न करतो. तिला आयुष्याचं खरं महत्त्वं समजावतो. केजीला जगायला शिकवणारा मॅनीच केजीच्या जगण्याचं कारण बनतो. किझीचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मॅनी तिला पॅरिसला नेतो. मॅनीदेखील कॅन्सरग्रस्त आणि दिव्यांग असतो. मात्र तरी तो हसतखेळत जगत असतो. मॅनी जसं हसत केजीच्या आयुष्यात एंट्री घेतो तशीच एक्झिटही घेतो. मॅनीला तो एकटं सोडून जगाचा निरोप घेतो मात्र जाताना तिला जगणं शिकवून जातो. चित्रपटाचा हा शेवट मनाला चटका लावणारा आहे. हे वाचा - 'सुशांत आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी तयार',कंगनाच्या वकिलांचे मुंबई पोलिसांना पत्र 'दिल बेचारा' हा चित्रपट 2014 च्या  'फॉल्ट इन आर स्टार्स' या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी ही फिल्म दिग्दर्शित केली आहे. शशांक खेतान आणि सुप्रोतिम सेनगुप्ता यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर ए. आर. रेहमान यांनी संगीत दिलं आहे. या चित्रपटात सुशांत आणि संजना यांच्यासह सैफ अली खान आणि स्वस्तिका मुखर्जीदेखील आहे. हे वाचा - सुशांतचं अर्धवट राहिलेलं स्वप्न होणार पूर्ण; शेखर कपूर यांनी केली मोठी घोषणा हा चित्रपट मेमध्ये थिएटरला रिलीज होणार होता. मात्र कोरोनाव्हायरसच्या महासाथीतील लॉकडाऊनमुळे त्याची रिलीज डेट टाळावी लागली आणि सुशांतच्या निधनानंतर निर्मात्यांनी हा चित्रपट डिजीटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. सुशांतच्या चाहत्यांना हा चित्रपट थिएटरमध्येच पाहायचा होता. तशी त्यांनी मागणीही केली होती. मात्र तरी हा चित्रपट ऑनलाइन रिलीज करण्यात आला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या