NCB विरोधात सुशांतच्या घरातली व्यक्ती हायकोर्टात; ठोकला 10 लाखांचा दावा

NCB विरोधात सुशांतच्या घरातली व्यक्ती हायकोर्टात; ठोकला 10 लाखांचा दावा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात (sushant singh rajput) ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या NCB विरोधातच आता मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत  (Sushant Singh Rajput Case) मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोविरोधात (NCB) आता दावा ठोकण्यात आला आहे. सुशांतच्या घरात काम करणाऱ्या नोकराने एनसीबीविरोधात मुंबई हायकोर्टात (Bombay High court) धाव घेतली आहे. त्याने एनसीबीविरोधा 10 लाखांचा दावा ठोकला आहे.

सुशांतच्या घरात काम करणाऱ्या नोकराला ड्रग्ज प्रकरणात एनडीपीएस  कायद्याअंतर्गत ताब्यात घेण्यात आलं होतं. सुशांतसाठी त्याने ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोपही करण्यात आले. यानंतर काही दिवसांपूर्वीच मुंबई हायकोर्टाने त्याला जामीन दिला आहे. रिया चक्रवर्ती  आणि सॅम्युअल मिरांडासह त्यालाही जामिनावर सोडण्यात आलं होतं. मात्र आता त्याने एनसीबीने आपल्याला बेकायदेशीरित्या ताब्यात ठेवल्याचा आरोप केला आहे. मुंबई हायकोर्टात त्याने याचिका दाखल करत 10 लाख रुपयांची भरपाई मागितली आहे.

हे वाचा - संजय दत्तच्या तब्येतीबाबत महत्त्वाची बाब आली समोर, जवळच्या व्यक्तीने केला खुलासा

livelaw.in च्या वृत्तानुसार, त्याने आपल्या याचिकेत एनसीबीवर अनेक आरोप लावले आहे. एनसीबीने आपल्या रेकॉर्डमध्ये आपल्याला 5 सप्टेंबरला अटक केल्याचं म्हटलं आहे, मात्र आपल्याला  4 सप्टेंबरलाच रात्री दहा वाजता अटक करण्यात आली होती. 6 सप्टेंबरला दुपारी दीड वाजता कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर 9  सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या रिमांडमध्ये पाठवण्यात आलं.

नियमानुसार आपल्याला अटकेनंतर 24 तासांच्या आत कोर्टात हजर करावं लागतं. मात्र आपल्याला 36 तासांपेक्षा अधिक वेळानंतर हजर करण्यात आलं. हे सुप्रीम कोर्टाच्या गाइडलाइन्स आणि संविधानच्या कलम 22 चं उल्लंघन आहे, असं त्याने याचिकेत म्हटलं आहे.  या याचिकेवर मुंबई हायकोर्टात 6 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

हे वाचा - राजकुमार रावचा काँडम तोंडाजवळ घेतानाचा सीन पाच वर्षानंतर VIRAL

दरम्यान याचिकाकर्त्याला  5  सप्टेंबरला रात्री 8 वाजता अटक करण्यात आली, होती असं एनसीबीने म्हटलं आहे. पण लगेच अटकेची सूचना देण्यात आली नव्हती. 6  सप्टेंबरला सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी त्याला भावाला फोन करण्याची परवानगीही दिली होती, असंही एनसीबीने सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: October 20, 2020, 4:25 PM IST

ताज्या बातम्या