VIDEO : 'माझ्याबद्दल भयानक गोष्टी...', गुन्हा दाखल झाल्यानंतर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची पहिली प्रतिक्रिया

VIDEO : 'माझ्याबद्दल भयानक गोष्टी...', गुन्हा दाखल झाल्यानंतर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची पहिली प्रतिक्रिया

सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • Share this:

मुंबई, 31 जुलै : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये मोठं वादंग निर्माण झालं आहे. सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रिया चक्रवर्ती हिने पहिल्यांदाच आपली बाजू मांडली आहे.

'माझा देवावर आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मला न्याय नक्कीच मिळेल. माझ्याबद्दल इलेट्रॉनिक मीडियामध्ये अनेक विचित्र गोष्टी बोलल्या जात आहेत. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी त्यावर बोलणार नाही. सत्याचा विजय होईल,' असं म्हणत अभिनेता सुशांतसिंह राजूपत याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने या वादावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

रिया चक्रवर्ती अडचणीत येणार?

सुशांत सिंह राजपूतचा जवळचा मित्र आणि त्याचा जुना स्टाफ मेंबर असणाऱ्याने बिहार पोलिसांना अशी माहिती दिली आहे की, त्याने सुशांतला घरच्यांशी बातचीत करण्यास सांगितले होते. पण सुशांतने त्याला अशी माहिती दिली होती की, रिया (Rhea Chakraborty) त्याचा फोन चेक करते आणि तो स्वत:च्या मर्जीने काही करू शकत नव्हता.

बिहार पोलीस सुशांतच्या या मित्राला-ज्याचे नाव सुशांतच्या वडिलांनी एक सुशांतचा जवळचा मित्र म्हणून एफआयआरमध्ये नमुद केले आहे-तो या प्रकरणात बिहार पोलिसांचा मुख्य साक्षीदार बनू शकतो.

दरम्यान, ईडीने सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाशी संबधित पैशांचे जे काही व्यवहार झाले, त्यांची चौकशी ई़डीकडून केली जाणार आहे. बिहार पोलिसांच्या सुशांत मृत्यूप्रकरणातील एफआयआरच्या आधारावर मनी लाँड्रिंगची केस दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी ईडीने याप्रकरणातील एफआयआर आणि इतर कागदपत्र बिहार पोलिसांकडे मागितले होते. त्याचप्रमाणे ईडीने रिया चक्रवर्ती कुटुंबाच्या दोन्ही कंपन्यांच्या बँक खात्यांची माहिती, तसंच सुशांतच्या बँक खात्यांची माहिती मागवून घेतली होती.

Published by: Akshay Shitole
First published: July 31, 2020, 6:35 PM IST

ताज्या बातम्या