सुशांतला वेडं ठरवून त्याचा पैसा लुटायचा रियाचा होता डाव; वडिलांनी केले गंभीर आरोप

सुशांतला वेडं ठरवून त्याचा पैसा लुटायचा रियाचा होता डाव; वडिलांनी केले गंभीर आरोप

सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीत सुशांतला आत्महत्या करण्यात काही फिल्मी लोकांचा हात होता, असं लिहिलं आहे. तक्रारीत कुणा एका व्यक्तीविरोधात आरोप नाही. पण सुशांतच्या गर्लफ्रेंडवर वेगळा आरोप करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 28 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Demise) आत्महत्या प्रकरणाला आथा वेगळं वळण मिळालं आहे. सुशांतचे वडील कृष्णा सिंह यांनी पाटणा पोलीस ठाण्यात FIR दाखल केली आहे. त्यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (rhea chakraborty) आणि तिच्या कुटुंबावर आरोप केले आहेत. सुशांतला वेडं ठरवून त्याचे पैसे लुटायचा डाव रिया आणि तिच्या कुटुंबाचा होता असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे.

सुशांतच्या वडिलांनी सांगितलं, "सुशांतला काही दिवसांतच भेटल्यानंतर रियाने त्याच्या आधीच्या घरात भूत असल्याचं सांगून त्याला घर बदलायला लावलं. त्यानंतर ज्या दुसऱ्या घरात सुशांत शिफ्ट झाला तिथं रिया आपल्या पूर्ण कुटुंबासह राहू लागली. रियाच्या कुटुंबाने त्याच्या घरातील नोकरही बदलले होते"

"रिया सुशांतचं मानसिक संतुलन खराब असल्याचं सांगू लागली. इतकंच नाही तर सुशांतला वेडं ठरवून त्याला मनोरुग्णालयात पाठवण्याची तयारीही रियाने केली होती. काही कारण नसताना डेंग्यू असल्याचं सांगून तिनं सुशांतला औषधं देणं सुरू केलं"

सुशांतला कुटुंबापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

"सुशांतसह अभिनेत्री म्हणून काम करायला मिळेल याच अटींवर ती फिल्मच्या ऑफर्स स्वीकारायची.  जेव्हा सुशांत केरळमध्ये आपला मित्र महेश शेट्टीसह शेतीचं काम सुरू करणार होता तेव्हादेखील रियाने त्याच्यावर दबाव ठेवला होता.

हे वाचा - वडिलांच्या FIR नंतर सुशांत प्रकरणाला मोठी कलाटणी; रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप

सुशांत डिसेंबरमध्ये आपल्या बहिणीला भेटायला गेला होता मात्र फोन करून करून रियाने त्याला जबरदस्ती मुंबईला बोलावलं. सुशांतला त्याच्या कुटुंबापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न रियाच्या कुटुंबाने केला. रियाने सुशांतचा मोबाइल नंबरही बदलला होता जेणेकरून सुशांत आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींपासून आणि आपल्या कुटुंबापासून दूर राहेल."

सुशांतला पैसे गायब केले, धमकी दिली

"सुशांतच्या अकाऊंटमधून रिया आणि तिच्या कुटुंबाने कोट्यवधी रुपये गायब केलेत. सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच रिया सुशांतचं क्रेडिट कार्ड आणि आवश्यक कागदपत्रं घेऊन घरातून निघून गेली आण सुशांतचा नंबरही ब्लॉक केला.

हे वाचा - कंगनाचा मोठा आरोप; सुशांतच्या मृत्यूच्या 2 दिवसांपूर्वी रियासह महेश भट झाले गायब

रियाने सुशांतला धमकी दिली होती की लवकरच ती मीडियामध्ये सुशांतचा मेडिकल रिपोर्ट समोर आणेल जेणेकरून मीडिया सुशांतला वेडं समजेल आणि सुशांतला कुणी काम देणार नाही. यामुळेच सुशांत आत्महत्येपूर्वी खूप समस्येत होता. त्याने आपल्या बहिणीलाही बोलावलं होतं"

सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं

"सुशांतच्या बहिणीची मुलं लहान आहेत त्यामुळे काही दिवस ती राहिली आणि सुशांतला समजावून त्याला धीर देऊन ती  तिथून निघून गेली. मात्र रिया सुशांतची कागदपत्रं आणि पैसे बळकावून सातत्याने त्याला मीडियासमोर जाण्याची धमकी देऊन त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करत होती. रियाने घर सोडल्यानंतरही सुशांतने तिला फोन केला होता कारण ती धमकी देऊन गेली होती. मात्र रियाने सुशांतचा नंबर ब्लॉक केला होता"

हे वाचा - "सुशांतने आत्महत्या केली यावर माझा विश्वास नाही", सुशांतच्या डॉक्टरांचा VIDEO

सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीत सुशांतला आत्महत्या करण्यात काही फिल्मी लोकांचा हात होता, असं लिहिलं आहे. तक्रारीत कुणा एका व्यक्तीविरोधात आरोप नाही. पण सुशांतच्या गर्लफ्रेंडवर वेगळा आरोप करण्यात आला आहे. रिया चक्रवर्तीने सुशांतच्या खात्यातून 17 कोटी रुपये काढले असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.

Published by: Priya Lad
First published: July 28, 2020, 9:20 PM IST

ताज्या बातम्या