BREAKING: सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी पाटण्यात दाखल केली FIR, पोलिसांची टीम मुंबईत दाखल

BREAKING: सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी पाटण्यात दाखल केली FIR, पोलिसांची टीम मुंबईत दाखल

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू (Sushant Singh Rajput Demise) प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. आता या प्रकरणी पाटणा पोलिसांनी देखील पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

  • Share this:

पाटणा, 28 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू (Sushant Singh Rajput Demise) प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. आता या प्रकरणी पाटणा पोलिसांनी देखील पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. या घटनेप्रकरणी सुशांतचे वडिल कृष्णा सिंह (Mr. KK Singh) यांनी पाटणा पोलिसात एफआयआर दाखल केली आहे. याप्रकरणी काही संभाव्य अटकेसाठी पटना पोलिसांची 4 जणांची टीम मुंबईमध्ये दाखल झाली आहे. यांसदर्भात या पटना पोलिसांच्या टीमने मुंबई पोलिसांची भेट घेतली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्तक्षेपानंतर ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी बिहार पोलीस मुंबई पोलिसांव्यतिरिक्त स्वतंत्रपणे तपास करतील. पाटणा पोलिसांकडून भादवी कलम 341, 342, 380, 406, 420, 306 या अंतर्गत अटक होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या प्रकरणातील तपासाबाबत सुशांतच्या कुटुंबीयांनी मौन बाळगले होते. मात्र आता सुशांतचे वडील केके सिंह यांनी एफआयआर दाखल केल्याने पाटणा पोलिसांचा या प्रकरणातील हस्तक्षेप निश्चित आहे.

(हे वाचा-बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का, ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप)

याप्रकरणी लोजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर यासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती देखील मिळत आहे. पासवान यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी  मागणी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस योग्य दिशेने तपास करत असल्याचे आश्वासन पासवान यांना दिले आहे. या प्रकरणाचा तपास योग्य मार्गे सुरू असून कुणालाही यामध्ये सूट मिळणार नाही, असे आश्वासन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. जर सीबीआय चौकशीची गरज भासली, तर त्यामध्येही मागे पडणार नसल्यासं मुख्यमंत्री म्हणाले.

(हे वाचा-'सुशांतला न भेटलेली माणसंही आज वाद घालत आहेत', सोनू सूदने साधला कंगनावर निशाणा!)

दरम्यान याआधी माजी खासदार पप्पू यादव, अभिनेता शेखर सुमन, राजद नेते तेजस्वी यादव यांसारख्या बिहारमधील अनेकांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पप्पू यादव यांनी यासंदर्भात गृह मंत्रालयाला पत्र देखील लिहिले आहे. भाजप नेते रामेश्वर चौरसिया यांनी देखील याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

रामेश्वर चौरसिया यांनी अभिनेता सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. बिहारचे भाजपचे माजी आमदार आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव रामेश्वर चौरसिया यांनी मंगळवारी केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांची भेट घेतली. त्यांनी गृह राज्यमंत्री यांना एक पत्र सादर केले, ज्यात सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. न्यूज 18 शी बोलताना रामेश्वर चौरसिया यांनी अशी माहिती दिली की त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे सीबीआय चौकशीबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही बोलण्याची मागणी केली.

ते म्हणाले की सुशांतने आत्महत्या केली नाही, त्याची हत्या झाली आहे. याबद्दल बिहारमधील लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. कारण राज्यातून शत्रुघ्न सिन्हा नंतर सुपरस्टार होण्याच्या मार्गावर असलेला तो दुसरा अभिनेता होता. म्हणूनच, तो व्यक्ती आत्महत्या करू शकतो यावर कोणालाही विश्वास नाही. एकंदरीत याप्रकरणी बिहारमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 28, 2020, 6:00 PM IST

ताज्या बातम्या