मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांची तब्येत बिघडली; रुग्णालयात उपचार सुरू

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांची तब्येत बिघडली; रुग्णालयात उपचार सुरू

सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 20 डिसेंबर: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आजही त्याचे चाहते विसरले नाहीत. सुशांत गेल्यानंतर त्याचे वडील केके सिंह (K. K Singh) यांनी मुलाला न्याय मिळावा म्हणून बरेच प्रयत्न सुरू केले होते. पण त्यांचीच तब्येत सध्या बिघडली आहे. सूत्रांकडे मिळालेल्या माहितीनुसार त्यांना हृदयाशी संबंधित आजाराचा सामना करावा लागत आहे. केके सिंह सध्या रुग्णालयात भरती झाले आहेत. केके सिंह यांना हरयाणाच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयातला त्यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये स्वत: केके सिंह आणि सुशांतच्या बहिणी प्रियांका आणि मितू सिंह दिसून येत आहेत. त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
14 जून 2020 रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (bollywoord actor Sushant Singh Rajput) यांनं आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी सुशांतनं आत्महत्या केली. सुशांतसिंग राजपूत एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आला. 'काय पो छे!' या चित्रपटात सुशांत मुख्य अभिनेता होता. महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर चित्रित करण्यात आलेल्या एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातही काम केलं होतं.
First published:

Tags: Sushant sing rajput, Viral photo

पुढील बातम्या