Home /News /entertainment /

'सारा अली खानला प्रपोज करणार होता सुशांत पण...' अभिनेत्याच्या फार्महाऊसच्या केअर टेकरचा दावा

'सारा अली खानला प्रपोज करणार होता सुशांत पण...' अभिनेत्याच्या फार्महाऊसच्या केअर टेकरचा दावा

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) त्यांचा सिनेमा केदारनाथ (Kedarnath)च्या शूटिंगदरम्यान एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती.

    मुंबई, 05 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) त्यांचा सिनेमा केदारनाथ (Kedarnath)च्या शूटिंगदरम्यान एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी सुशांतचा मित्र सॅम्युअल हॉकिप (Samuel Hookip) याने देखील दोघांच्या नात्याबाबत भाष्य केले होते. असे सांगितले जात आहे की, केदारनाथच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले होते आणि दोघे रिलेशनशीपमध्ये देखील होते. सुशांत या नात्याकडे खूप गांभीर्याने पाहत होता पण ते फारसे टिकले नाही, अशा चर्चा देखील काही दिवस केल्या गेल्या. आता सुशांत सिंह राजपूतच्या फार्महाऊसवरील केअर टेकर रईसने देखील असा दावा केला आहे की, सुशांत आणि सारा डेट करत होते. सुशांत या नात्याबाबत खूप सीरियस होता आणि तो साराला प्रपोज देखील करणार होता. रईसच्या मते सारा अनेकदा सुशांतच्या फार्महाऊसवर येऊन थांबत असे. रईसने एका मुलाखतीमध्ये असे म्हटले आहे की, 'सारा मॅडम सुशांतच्या घरी 2018 मध्ये फार्महाऊसवर येत असे. जेव्हा दोघे यायचे तेव्हा 3-4 दिवस थांबत असत. 2018 मध्ये थायलंड ट्रिपवरून परतल्यानंतर देखील सारा मॅडम आणि सुशांत सर थेट फार्महाऊसवर आले होते.' रईसने पुढे असे म्हटले की, 'सारा मॅडमचा स्वभाव खूप चांगला होता. त्या कधी एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे वागत नसत. मला रईस भाई आणि फार्महाऊसवर काम करणाऱ्या बाईंना मावशी म्हणून हाक मारत असत.' त्याचप्रमाणे रईसने असा दावा केला आहे की, दमण ट्रीपच्या दरम्यान सुशांत सारा अली खानला प्रपोज करण्याची तयारी करत होता. मात्र रईसला नेमके हे ठावुक नव्हते की तो तिला लग्नासाठी मागणी घालणार होता की नाही. रईसच्या मते 'सुशांतने साराला दमण ट्रीपच्या वेळी प्रपोज करण्याची तयारी केली होती, पण काही कारणामुळे दोघांची ही ट्रीप रद्द झाली. यानंतर दोघांनी केरळ जाण्याची योजना आखली मात्र तिथे देखील जाऊ शकले नाहीत. त्यानंतर फेब्रुवारी-मार्च 2019 दरम्यान असे माहित झाले की दोघांचा ब्रेकअप झाला आहे. रईसच्या मते जानेवारी 2019 नंतर सारा कधी फार्महाऊसवर आली नाही
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Sara ali khan, Sara ali khan relationship, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या