सुशांतच्या मृत्यूला 2 महिने पूर्ण, कुटुंबीयांनी जारी केले जानेवारीमधील UNSEEN VIDEO

सुशांतच्या मृत्यूला 2 महिने पूर्ण, कुटुंबीयांनी जारी केले जानेवारीमधील UNSEEN VIDEO

सुशांतच्या मृत्यूला आज 2 महिने पूर्ण होत आहेत. सुशांतचे काही Unseen व्हिडीओ समोर येत आहेत, ज्यामध्ये तो भजन गाताना दिसत आहे आणि बहिणींबरोबर मस्ती करताना देखील दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) जाऊन आज 2 महिने पूर्ण झाले आहेत. मात्र आजही त्याचे चाहते, त्याचे कुटुंबीय हा धक्का सहन करू शकले नाही आहेत. सुशांतच्या मृत्यूबाबत 'आत्महत्या' पासून 'हत्या' अशा अनेक गोष्टींबाबत दावे करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सुशांत नैराश्यात असण्यासंदर्भातही दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशावेळी सुशांतचे काही Unseen व्हिडीओ समोर येत आहेत, ज्यामध्ये तो भजन गाताना दिसत आहे आणि बहिणींबरोबर मस्ती करताना देखील दिसत आहे.

हे व्हिडीओ याचवर्षीचे जानेवारी महिन्यातील आहेत. जानेवारी सुशांत त्याच्या कुटुंबीयांबरोबर पंचकुला फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळचे त्याचे ड्रायव्हिंग करताना, बहिणीबरोबर क्रिकेट खेळताना आणि श्रीकृष्ण भजन गातानाचे व्हिडीओ समोर येत आहेत. यामध्ये सुशांत खूप मौजमस्ती करताना दिसत आहे. हे व्हिडीओ पाहून एखाद्याचा विश्वास बसणार नाही की सुशांत एवढे टोकाचे पाऊल उचलेल. सुशांतच्या परिवाराकडून हे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुशांतचे त्याच्या कुटुंबीयांबरोबर नाते चांगले नसल्याचा आरोप केला होता. या आरोपाबाबत नाराजी व्यक्त करत सुशांतच्या परिवाराने त्यांची बदमामी करण्यासाठी हे कॅम्पेन सुरू आहे, असा आरोप करणारे 9 पानांचे पत्र जारी केले होते.

सुशांतच्या कुटुंबीयांनी जारी केलेल्या या पत्राची सुरुवात जलालपुरी शेरने करण्यात आली आहे- तू इधर-उधर की न बात कर ये बता क‍ि काफ‍िला क्‍यों लुटा, मुझे रहजनों से ग‍िला नहीं तेरी रहबरी का सवाल है...' संजय राऊत यांनी लेखामध्ये असे म्हटले होते की सुशांतचे त्याच्या बहिणीबरोबर संबंध चांगले नव्हते. सुशांतच्या कुटुंबीयांनी या पत्रामध्ये म्हटले आहे की, 'पहिल्या मुलीबरोबर जादू झाली, कुणी आले आणि तिला परदेशी घेऊन गेले (सुशांतची मोठी बहिण लग्नानंतर अमेरिकेत असते), दुसरी बहिण देशाच्या क्रिकेट टीममध्ये खेळते, तिसरी कायद्याचे शिक्षण घेत आहे तक चौथी फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा करत आहे आणि पाचवा सुशांत होता जो त्याच्या आईची 'मन्नत' होता. संपूर्ण आयुष्य या परिवाराने कुणाकडून काही घेतले नाही आणि ना ही कुणाला नुकसान पोहोचवले.'

हे व्हिडीओ पाहून सुशांत किती जिंदादिल होता, किती हसमुख होता हेच समोर येत आहे. त्याच्या कुटुंबीयांकडून न्यायाची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर #CBIforSSR हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. सुशांतच्या बहिणीने देखील अशाप्रकारे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्याचप्रकारे सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे, अभिनेता वरूण धवन, अभिनेत्री क्रिती सॅनन यांनी देखील #CBIforSSR च्या पोस्ट केल्या आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 14, 2020, 3:36 PM IST

ताज्या बातम्या