Home /News /entertainment /

FACT CHECK: सुशांतच्या वडिलांनी केली आत्महत्येच्या CBI चौकशीची मागणी? वाचा मोठा खुलासा

FACT CHECK: सुशांतच्या वडिलांनी केली आत्महत्येच्या CBI चौकशीची मागणी? वाचा मोठा खुलासा

या प्रकरणाची मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. त्यात बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गजांची चौकशी झाली आहे.

    मुंबई 4 जुलै: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्या प्रकरणाची त्याचे वडिल के.के सिंह (K.K singh) यांनी CBI चौकशीची मागणी केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. त्यांनी सुशांतच्या आत्महत्येबद्दल संशय व्यक्त करत अशी मागणी केल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र आता त्याबद्दल सुशांतच्या कुटुंबीयांनी मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणी कुठलाही संशय नसून कुटुंबीयांनी अशी कुठलीही मागणी केली नसल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. वडिल के.के सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून अशा प्रकारची मागणी केल्याचं वृत्तही काही माध्यमांनी दिलं होतं. मात्र अशा प्रकारचं कुठलंही ट्विटर हँडल त्यांचं वडिलांचं नाही आणि 27 जून नंतर कुटुंबीयांकडून कुठलंही वक्तव्य देण्यात आलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. अष्टपैलू अभिनेता असलेल्या सुशांतने 14 जूनला त्याच्या बांद्रे इथल्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाची मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. त्यात बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गजांची चौकशी झाली आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण, त्या 'हिरव्या कपड्या'वर संशय अशाच प्रकारचं चुकीचं वृत्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबतही सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. त्यानंतर खुद्दल राज ठाकरे यांनीच त्याचा खुलासा केला होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या नवोदितांचा छळ केला जातो अशी चर्चा सुरू झाली होती. त्याच छळामुळे सुशांतला नैराश्य आलं होतं असंही म्हटलं जातं. त्यामुळे अशा छळ होणाऱ्या कलाकारांनी काही अडचण असल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा. त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. KRK चा खोटारडेपणा उघड, सुशांतबाबत केलं होतं धक्कादायक वक्तव्य; पाहा VIDEO त्यानंतर राज ठाकरे यांनी हा खुलासा केला आहे. मनसेची ही भूमिका नसल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं असून त्यामुळे एका वादावर आता पडदा पडला आहे. संपादन - अजय कौटिकवार  
    First published:

    Tags: Sushant sing rajput

    पुढील बातम्या