Home /News /entertainment /

सुशांत सिंह राजपूतच्या Ex गर्लफ्रेंडची अचानक झाली टक्कर, नंतर जे घडलं...पाहा VIDEO

सुशांत सिंह राजपूतच्या Ex गर्लफ्रेंडची अचानक झाली टक्कर, नंतर जे घडलं...पाहा VIDEO

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  मुंबई, 10 मार्च-  बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेत्री क्रिती सेनन  (Kriti Sanon) आणि अंकिता लोखंडे  (Ankita Lokhande)  यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये क्रिती आणि अंकिताची अचानक भेट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील फिल्मसिटीमध्ये दोघी एकमेकींसमोर आल्या होत्या. अंकितासोबत तिचा पती विकी जैनही  (Vicky Jain)  होता.चाहते त्यांच्या भेटीला विचित्र म्हणत आहेत. क्रिती सध्या अक्षय कुमारसोबत आपल्या आगामी 'बच्चन पांडे'  (Bachchan Pandey) चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता आपला पती विकी जैनसोबत सेटवर असताना दिसते. अचानक समोरून अभिनेत्री क्रिती सेनन येते. यांनतर दोघीही एकमेकींना पाहून थांबतात. आणि एकमेकींना आलिंगनसुद्धा देतात. त्यांनतर अंकिताचा पतीसुद्धा क्रितीला भेटतो. त्यांनतर हे तिघेही आपापल्या वाटेवर निघून जातात. प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
  परंतु हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहते यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. चाहत्यांना अंकिता आणि क्रितीची ही भेट फारच विचित्र वाटत आहे. कारण या दोघीही सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. अशात या दोघी समोरासमोर येणं म्हणजे फारच विचित्र असल्याचं युजर्स म्हणत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं आहे, 'ऑकवर्ड, क्रितीला बोलायचं नव्हतं मात्र अंकिताने जबरदस्ती हाक दिली'. तर दुसऱ्याने लिहिलं, 'किती विचित्र भेट होती'. (हे वाचा:'मी दिव्याचा तिरस्कार..', ब्रेकअपनंतर दिव्याबद्दल काय म्हणाले वरुण सूदचे वडिल?) चाहते असं म्हणण्या मागचं कारण दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आहे. या दोन्ही अभिनेत्री सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. अंकिता आणि सुशांतने आपलं नातं सर्वांसमोर जाहीर केलं होतं. परंतु क्रिती आणि सुशांतच्या नात्याबद्दल अंदाज लावला जात होता. या दोघांनी आपलं नातं जाहीर केलं नव्हतं. पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर अंकिता आणि सुशांतची भेट झाली होती. त्यांनतर त्यांनी रिअल लाईफमध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. हे दोघेही अनेक वर्ष एकत्र होते. त्यांनतर यांचा ब्रेकअप झाला होता. तर क्रिती आणि सुशांतने राबता या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटानंतर त्यांच्या अफेयर्सच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Ankita lokhande, Bollywood, Entertainment, Kriti sanon, Sushant sing rajput

  पुढील बातम्या