मुंबई, 10 डिसेंबर: अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) जाऊन आता जवळपास सहा महिने झाले आहेत. मात्र अद्यापही त्याचे चाहते, मित्रपरिवार, कुटुंबीय यांना हे सत्य पचवणं कठीण जातं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून ते सुशांतची आठवण काढत असतात. अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि सुशांत यांच्यामध्ये देखील एक स्पेशल बाँड होता. दोघं अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता पूर्णपणे हादरली होती. तिने सोशल मीडियावर त्याच्यासाठी काही पोस्टही केल्या होत्या. सुशांतला न्याय मिळावा अशी मागणी करणाऱ्यांमध्ये अंकिंता देखील होती. आता देखील अंकिताने सुशांतच्या आठवणीत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
अंकिता लोखंडेने सुशांत सिंह राजपूतला एका अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. सुशांत अभिनयाबरोबर डान्समध्ये देखील एक्सपर्ट होता. याच डान्सच्या माध्यमातून अभिनेत्रीने सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. 'कौन तुझे यूं प्यार करेगा' या सुशांतच्याच गाण्यावर अभिनेत्रीने डान्स केला आहे. एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी (MS Dhoni: The Untold Story) या सिनेमातील हे गाणं आहे. अंकिताने या डान्सचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत.
View this post on Instagram
झी रिश्ते अवॉर्ड्समध्ये (Zee Rishtey Awards 2020) मध्ये अंकिता हा परफॉरमन्स करणार आहे. तिने या डान्सचा रिहर्सल व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
View this post on Instagram
27 डिसेंबर रोजी सुशांत आणि अंकिताच्या चाहत्याना अंकिताचा हा डान्स परफॉरमन्स पाहता येणार आहे. अंकिताचा हा सुंदर परफॉर्मन्स तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. तिच्या या श्रद्धांजलीमुळे अनेकांना त्यांच्या बेस्ट जोडीचीही आठवण झाली आहे. अंकिता आणि सुशांतने डान्स शो केला होता. त्याचप्रमाणे विविध पुरस्कार सोहळ्यातही त्यांनी एकत्र परफॉर्म केलं होतं. अंकिताच्या या सुंदर परफॉर्मन्स नंतर चाहत्यांना सुशांतची कमतरता अधिक जाणवू लागली आहे. अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ व्हायरल (Video Viral on Social Media) अशा अनेक कमेंट्स सोशल मीडियावर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sushant Singh Rajput