आम्हाला सत्य समजायलाच हवं; सुशांतच्या बहिणीनंतर एक्स गर्लफ्रेंडनेही मागितला न्याय

आम्हाला सत्य समजायलाच हवं; सुशांतच्या बहिणीनंतर एक्स गर्लफ्रेंडनेही मागितला न्याय

सुशांतची सिंह राजपूतची (sushant singh rajput) एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (ankita lokhande) त्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्या कुटुंबासह खंबीरपणे उभी राहिली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Case) तपास कोण करणार याबाबत आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊ शकते. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी याचा तपास केला, मग सुशांतच्या कुटुंबाने बिहार पोलिसात एफआयआर दाखल केला आणि सीबीआयनेही (CBI) आरोपपत्र दाखल केलं आहे. ही केस सीबीआयकडे सोपवण्यात यावी अशी मागणी केली जाते आहे. सुरुवातीला अशी मागणी  करणारी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने (rhea chakraborty) मात्र सर्वोच्च न्यायालयात याचा विरोध केला आहे.  मात्र सुशांतची एक्स गर्लफ्रेंड सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्या कुटुंबाच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आहे.

सीबीआय चौकशी व्हावी आणि सुशांतला न्याय मिळावा अशी मागणी सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने केली. तिने आपल्या सोशल मी़डियावर व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर आता अंकिता अंकिता लोखंडेनेही (ankita lokhande) अशी मागणी करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. अंकिताने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत #CBIforSSR ची मागणी केली आहे.

View this post on Instagram

#justiceforsushantsinghrajput. #CBIforSSR

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

"सुशांतसह नेमकं काय झालं हे देशाला समजायलाच हवं", असं अंकिता म्हणाली आहे. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी अंकिता त्याच्या कुटुंबासह उभी राहिली आहे.

हे वाचा - ED च्या चौकशीत समोर आलं वेगळंच; Ex गर्लफ्रेंडच्या घराचा EMI जात होता सुशांतकडून

सुशांतची बहिण श्वेताने याआधी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिनं आम्हाला सत्य जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं म्हटलं आहे.

श्वेता म्हणाली, "मी तुम्हाला एक विनंती करते की पुन्हा एकदा एकत्र या आणि या केससाठी सर्वांनी एकजूट होऊन सीबीआय चौकशीची मागणी करावी. आम्हाला सत्यता जाणून घ्यायचे आहे आणि हे सत्य जाणून घेण्याचा आमचा हक्क आहे. जर असे नाही झाले तर आम्ही सत्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आम्ही शांतीपूर्ण जीवन जगू शकणार नाही"

हे वाचा - सुशांत, शोविकसह एकाच दिवसात स्वीसचा दोनदा दौरा; रियावर ईडीचा संशय अधिकच वाढला

या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी सुशांतच्या कुटुंबीयांची इच्छा आहे.सुशांतच्या चाहत्यांकडून देखील वारंवार सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकार आणि रिया चक्रवर्तीने सीबीआयने नोंदवलेली एफआयआर मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. तर बिहार सरकार आणि सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी याला विरोध दर्शविला आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआय करेल की मुंबई पोलीस यावर न्यायालयाचा निर्णय येणे बाकी आहे.

Published by: Priya Lad
First published: August 13, 2020, 6:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading