जेव्हा सुशांतने आपलं बारावं स्वप्नं केलं होतं पूर्ण; Throwback Video Viral

जेव्हा सुशांतने आपलं बारावं स्वप्नं केलं होतं पूर्ण; Throwback Video Viral

सुशांत सिंह राजपूतच्या (sushant sing rajput) स्वप्नांच्या लिस्टमध्ये आपल्या Delhi Technological University ला भेट देणं याचाही समावेश होता.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र सुशांतच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्याचं कुटुंबं आणि जवळच्या व्यक्तीच नाही तर त्याचे चाहतेही सुशांतला विसरू शकले नाहीत. सुशांतच्या आठवणीत पुन्हा त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

सुशांत हा स्वप्नं पाहून ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करायचे. त्याचे आपल्या अशा स्वप्नांची यादी तयारी केली होती. त्यापैकी बहुतेक स्वप्नं त्याने पूर्ण केली होती. सुशांतच्या अशाच पूर्ण झालेल्या स्वप्नांपैकी एका स्वप्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होतो आहे. सुशांतचं हे स्वप्नं म्हणजे दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीला (Delhi Technological University) भेट देणं. गेल्या वर्षीच सुशांतचं हे स्वप्नं पूर्ण झालं. ज्याचा व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे.

2003 साली सुशांतने दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेत ऑल इंडिया सातवी रँक मिळवली होती. दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग म्हणजे आताची दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीतून मेकॅनिकल इंजीनिरिंगचा अभ्यास सुरू केला. मात्र तिसऱ्या वर्षीच त्याने इंजीनिअरिंग सोडून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. मात्र त्याचं इंजिनीअरिंग आणि आपल्या कॉलेजबाबत असलेलं प्रेम कायम होतं. त्याने यशाची शिखरं गाठली तरी तो आपल्या कॉलेजला कधीच विसरला नाही आणि त्यामुळेच आपल्या कॉलेजला पुन्हा भेट देणं हे त्याच्या स्वप्नांच्या यादीत होतं. जे त्यानं पूर्ण केलं.

हे वाचा - जिया खानच्या आईचा #CBIForSSR ला पाठिंबा, म्हणाल्या- माझ्या मुलीप्रमाणे...

आपल्या सोशल मीडियावरदेखील त्याने हे स्वप्नं पूर्ण केल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. सुशांत आपलं संपूर्ण कॉलेज फिरला. कॉलेजमधील कँटिन, वर्गातही तो गेला. आपलं हे स्वप्नं पूर्ण करताना तो खूप आनंदी दिसत होता. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी त्याच्यासह सेल्फीही घेतला, हात मिळवला. त्याला खूप प्रेम मिळालं.

Published by: Priya Lad
First published: August 14, 2020, 3:29 PM IST

ताज्या बातम्या