Home /News /entertainment /

सुशांतने चंद्रावर खरेदी केलेली जागा; 'त्या' ठिकाणी जाण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं

सुशांतने चंद्रावर खरेदी केलेली जागा; 'त्या' ठिकाणी जाण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं

सुशांत सिंह राजपूतने (sushant singh rajput) नासामध्ये ट्रेनिंगही घेतलं होतं.

    मुंबई, 14 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (sushant sing rajput) मुंंबईत आपलं आलिशान घर तर घेतलं होतंच मात्र तुम्हाला माहिती आहे का? त्याने चंद्रावरही (moon) जमीन विकत घेतली होती. चंद्रावरील जमिनीचा एक तुकडा सुशांतने खरेदी केला होता आणि याच ठिकाणी जाण्याचं त्याचं स्वप्न होतं. मात्र हे स्वप्न अधुरच राहिलं. बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जाणाऱ्या सुशांत सिंग राजपूतनं दिल्ली टेक्नोलॉजिकल यूनिव्हर्सिटीमधून मॅकेनिकल इंजीनियरिंगचं शिक्षण घेतलं होतं. या युनिव्हर्सिटीच्या एंटरन्स एग्झाममध्ये त्याला 7 वी रँक मिळाली होती. सुशांत सिंह राजपूतला चंद्रावर जायचं होतं. काही वर्षांपूर्वी चंद्रावरील सी ऑफ मस्कॉवी रिजनमधील जमिनीचा एक तुकडाही त्याने खरेदी केला होता. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने आपली चंद्रावरील ही जागा दाखवली होती.
    View this post on Instagram

    The My Side Of The Moon 🌓 #dreams

    A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput) on

    'द माय साइड ऑफ मून  #dreams' असं कॅप्शन सुशांतने या फोटोला दिलं होतं. हीच ती सुशांतची चंद्रावरील जागा. नासाच्या मोहिमेअंतर्गत चंद्रावरील आपल्या या ठिकाणी जाण्याची इच्छाही सुशांतने व्यक्त केली होती. सुशांत याने एका चित्रपटात अंतराळवीराची भूमिका करणार होता. यासाठी त्याने नासामध्ये ट्रेनिंगही घेतलं होतं. मात्र कारणामुळे हा प्रोजेक्ट सुरू झाला नाही. सुशांतला नासाच्या 2024 च्या चांद्रमोहिमेत जायचं होती आणि त्यासाठी त्याने तयारीही सुरू केली होती. हे वाचा - अभिनेता सुशांत सिंहला व्हायचं होतं इंजीनिअर, परीक्षेत पटकावला होता सातवा क्रमांक आपलं हे स्वप्न पूर्ण करण्याआधीच सुशांतने आपलं जीवन संपवलं.  बांद्रा इथल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. पोलीस या प्रकरणी पुढचा तपास करत आहेत.  पोलिसांच्या माहितीनुसार, सुशांतसिंह राजपूतवर मानसोपचार सुरू होते. तो नैराश्यात होता आणि उपचार घेत होता. त्याच्या घरातून मेडिकल रिपोर्ट मिळाले आहेत. त्यानुसार डिप्रेशनवर तो उपचार घेत होता. संपादन - प्रिया लाड हे वाचा - मुंबईत 'या' ठिकाणी राहात होता सुशांत, पाहा EXCLUSIVE PHOTOS
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Sushant Singh Rajpoot, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या