Home /News /entertainment /

सुशांतच्या मदतनीसाच्या जबाबातून झाला मोठा उलगडा; शेवटचे 3 दिवस यामुळे होता अस्वस्थ

सुशांतच्या मदतनीसाच्या जबाबातून झाला मोठा उलगडा; शेवटचे 3 दिवस यामुळे होता अस्वस्थ

सुशांत सिंह राजपूतच्या धक्कादायक आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे. सुशांतच्या घरात कामाला असलेल्या मदतनीसाच्या जबाबातून त्याच्या शेवटच्या काही दिवसांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती हाती आली आहे.

    मुंबई, 15 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतवर मोजके मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले. पण त्याच्या धक्कादायक आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे. सुशांतच्या घरात कामाला असलेल्या नोकराच्या जबाबातून त्याच्या शेवटच्या काही दिवसांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती हाती आली आहे. पिंकव्हिलाच्या हवाल्याने News18 Hindi ने यासंदर्भात माहिती दिली आहे. शेवटच्या 10 दिवसांत सुशांत खूप निराश होता. शेवटचे तीन दिवस तर त्याची मनस्थिती अगदी वाईट होती. तो तीन दिवस कुणाशीच बोललेला नव्हता, असं त्याच्या घरात काम करणाऱ्या मदतनीसाने सांगितलं. या पोलीस चौकशीत मदतनीसाने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. सुशांतवर हिंदुजा रुग्णालयातून उपचार सुरू होते. पिंकव्हिलाच्या बातमीनुसार, या मदतनीसाने सांगितलं की, सुशांतने काही दिवसांपूर्वी घरच्या नोकरांना बोलावून सांगितलं होतं की, सगळी उधारी तर देऊन झाली आहे, पण आता पगार देऊ शकेन की नाही माहीत नाही. सुशांत सिंहला शेवटचा मेसेज करताना या अभिनेत्याला आला होता संशय, स्क्रिनशॉट आला समोर सुशांत शेवटचे तीन दिवस कुणाशीही बोलला नव्हता पवित्र रिश्तामध्ये सुशांतबरोबर काम करणारा कलाकार महेश शेट्टी आणि आपली बहीण यांच्याशीच त्याचं शेवटचं बोलणं झालं होतं. अन्य बातम्या 'सुशांतची आत्महत्या नव्हे मर्डर', करण जोहरचं नाव घेत कंगनानंतर बबिताचाही आरोप मुंबईतील 950 कोरोना मृत्यू का दडवले? फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Bollywood, Sushant Singh Rajpoot

    पुढील बातम्या