Home /News /entertainment /

मोठी बातमी! सुशांतची सिंह राजपूतची आत्महत्याच? फॉरेन्सिक अहवाल आला समोर

मोठी बातमी! सुशांतची सिंह राजपूतची आत्महत्याच? फॉरेन्सिक अहवाल आला समोर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death) एक नवी घडामोड समोर येत आहे.

    मुंबई, 11 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death) एक नवी घडामोड समोर येत आहे. याआधी याप्रकरणात विसरा रिपोर्ट समोर आला होता. आता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कलिना फॉरेन्सिक लॅबमधून  टॉक्सिकोलॉजी, सायबर, लिजीचर मार्क, नेल सॅम्पलिंग, स्टमक वॉश हे अहवाल देखील समोर आले आहेत. या अहवालांमध्ये कोणत्याही प्रकारचा फॉउल प्ले (Foul Play) नाही मिळाला आहे. हे अहवाल मुंबई पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जोडले आहेत. नेल सॅम्पलिंग अहवालामध्ये कोणत्याही प्रकारच्या झटापटीच्या खुणा नाही आहेत. अहवालानुसार त्याच्या शरीरावर आढळलेले पांढरे डाग त्यांच्या थुंकीचे आहेत, जे मृत्यूनंतर तोंडातून बाहेर आले होते. त्यानंतर ते कपड्यांवरच वाळल्यामुळे तिथे पांढरे डाग तयार झाले होते. या अहवालानुसार ते कोणतेही स्ट्रगल मार्क नाही आहेत. स्टमक वॉशचा अहवाल असे स्पष्टीकरण देत आहे की, सुशांतला कोणतेही विष किंवा विषारी गोष्ट देण्यात आली नव्हती. त्याचे पोट देखील क्लिअर होते. लीजिचर मार्कमध्ये देखील कोणतेही झटापटीचे किंवा जखम असणाऱ्या खुणा सापडल्या नाही आहेत. (हे वाचा-SSR Death Case : नवे वळण, सुशांतच्या वडिलांचा रिया-श्रुतीला केलेला 'तो' मेसेज..) दरम्यान विसरा रिपोर्टमध्ये देखील -Asphyxia Due to hanging(unnatural) सांगण्यात आले होते. हा फॉरेन्सिक अहवाल मुंबई पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही दाखल करण्यात आला आहे. विसरा रिपोर्टनुसार सुशांतच्या मृत्यूचे कारण आत्महत्या होते. (हे वाचा-सुशांतच्या कंपनीसह शेअर्स, FD बाबत 10 तास सुरू होती रिया आणि शौविकची चौकशी) सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईत त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  मुंबई पोलीस या प्रकरणात सातत्याने चौकशी करत होते. त्याचवेळी सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांच्या पथकानेही मुंबई गाठली. आता हे प्रकरण सीबीआयकडे आहे. दुसरीकडे, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची मनी लाँड्रिंगच्या अँगलने चौकशी करत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या