SSR Death : CBI अ‍ॅक्शनमध्ये! रिया चक्रवर्तीला कोणत्याही क्षणी चौकशीसाठी बोलावणार

SSR Death : CBI अ‍ॅक्शनमध्ये! रिया चक्रवर्तीला कोणत्याही क्षणी चौकशीसाठी बोलावणार

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात (Sushant Singh Rajput Case) वेगाने घडामोडी घडत आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार रियाला कोणत्याही क्षणी सीबीआयकडून चौकशीकरता बोलावण्यात येऊ शकते.

  • Share this:

मुंबई, 21 ऑगस्ट :  सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput Death) प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे (CBI) कडे आहे. येणाऱ्या काळात सीबीआयच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे सापडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान ही केस सीबीआयकडे गेल्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांसह त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता.

याप्रकरणात जिचे नाव सातत्याने समोर येत आहे त्या सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) चौकशी देखील सीबीआयकडून करण्यात येणार आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार रियाला कोणत्याही क्षणी सीबीआयकडून चौकशीकरता बोलावण्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे रिया-सुशांतचा मित्र असणारा महेश शेट्टी (Mahesh Shetty) याला देखील सीबीआय चौकशीसाठी बोलावू शकते. मृत्यूपूर्वी सुशांतने महेश शेट्टीला फोन केला होता. महेश नंतर त्याने रियाला देखील फोन केला होता. त्यामुळेच या दोघांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

(हे वाचा-हिंदूस्तानी भाऊला Instagram चा दणका! युजर्सच्या तक्रारीनंतर अकाउंट केलं निलंबित)

दरम्यान सध्या सुशांत सिंह राजपूत प्रकरणाने वेग घेतला आहे. सीबीआयचे अधिकारी गुरुवारी मुंबईत दाखल झाले आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपविल्यानंतर तपास अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे. सीबीआयने यासाठी एका एसआयटीचं (SIT) गठन केलं आहे. एसआयटीचं नेतृत्व सीबीआयचे जॉइंट डायरेक्टर मनोज शशीधर करतील. त्यांच्याशिवाय गगनदीप गंभीर, एसपी नुपूर प्रसाद आणि आणि अ‍ॅडिशनल एसपी अनिल यादव या टीमचा भाग असतील. हे सर्व अधिकारी सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास करतील.

(हे वाचा-PM नरेंद्र मोदींच्या पावलावर अक्षय कुमारचे पाऊल, पोस्ट शेअर करून दिली माहिती)

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी वेळोवेळी करण्यात येत होती. त्याचे कुटुंबीय त्याचप्रमाणे चाहत्याकडून ही मागणी वारंवार होत होती.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 21, 2020, 2:15 PM IST

ताज्या बातम्या