Home /News /entertainment /

SSR Case: रियाने नष्ट केले पुरावे? सुशांतचं घर सोडण्याआधी तब्बल 8 हार्ड डिस्कमधला डेटा केला डिलीट

SSR Case: रियाने नष्ट केले पुरावे? सुशांतचं घर सोडण्याआधी तब्बल 8 हार्ड डिस्कमधला डेटा केला डिलीट

मीडिया रिपोर्टनुसार, रियानं (Rhea Chakraborty) सुशांतचे घर सोडण्याआधी एका आयटी प्रोफेशनलकडून 8 हार्ड डिस्कमधला डेटा डिलीट करून घेतला होता अशी माहिती समोर आली आहे.

    मुंबई, 27 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput death case) मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. आता मीडिया रिपोर्टनुसार, रियानं (Rhea Chakraborty) सुशांतचे घर सोडण्याआधी एका आयटी प्रोफेशनलकडून 8 हार्ड डिस्कमधला डेटा डिलीट करून घेतला होता अशी माहिती समोर आली आहे. सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीच्या सीबीआय चौकशी दरम्यान, त्यानं हा खुलासा केला. दुसरीकडे सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनी असे सांगितले की, डेटा डिलीट केल्याचा अर्थ स्पष्ट आहे. याचा अर्थ सुशांतला मारण्याचा प्लॅन केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, पिठानीनं सीबीआयला सांगितले की, डेटा डिलीट करताना सुशांत तेथे उपस्थित होता, त्यानं कोणताही विरोध केला नाही. मात्र पिठानीने त्या हार्ड डिस्कमध्ये काय डेटा होता, याबाबत त्याला माहिती नाही. याआधी रियानं 8 जून रोजी सुशांतचे घर सोडले होते, अशी माहिती होती. वाचा- BREAKING: रिया चक्रवर्ती विरुद्ध अखेर FIR दाखल, NCBच्या कारवाईमुळे खळबळ हार्ड डिस्कमध्ये सुशांत आणि रियाचा खाजगी डेटा असू शकतो 8 जून रोजी रात्री रियानं भाऊ शोविक चक्रवर्तीला सुशांतच्या घरी बोलवले होते. त्यानंतर दोघांनी 3 बॅग पॅक करून सुशांतचे घर सोडले. सीबीआयनं सुशांतच्या बिल्डिंगमधील वॉचमनचीही चौकशी केली. दरम्यान, अशी शक्यता वर्तवली जात आहे की, रियानं डिलीट केलेल्या डेटामध्ये सुशांत आणि तिचे काही खाजगी व्हिडीओ किंवा फोटो असू शकतात. वाचा-SSR Case: 'चहामध्ये 4 थेंब टाक आणि त्याला...', रियाचे 6 चॅट समोर आल्याने खळबळ रिया चक्रवर्ती विरुद्ध अखेर FIR दाखल ड्रग्जचा पुरवढा होत असल्याची माहिती मिळाल्याने Narcotics Control Bureau म्हणजे NCBने रिया विरुद्ध FIR दाखल केला असून त्यामुळे रिया चक्रवर्ती आणखी अडचणीत आली आहे. सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) यांना ड्रग्जचा पुरवढा केला जात होता याचे पुरावे ईडी ला मिळाल्याचा दावा NCBचे संचालक राकेश अस्थाना यांनी केला आहे. त्यानंतर रिया विरुद्ध कलम 20, 22, 27, 29 NDPS Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या