BREAKING : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे

BREAKING : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput) रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा निर्णय दिला आहे. हे प्रकरण आता सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput) रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा निर्णय दिला आहे. हे प्रकरण आता सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांचे पालन केले पाहिजे आणि मदत केलीच पाहिजे, असे आदेश देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांसाठी हा मोठा झटका मानण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला संविधान बेंचमध्ये आव्हान देखील देऊ शकते.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी वेळोवेळी करण्यात येत होती. त्याचे कुटुंबीय त्याचप्रमाणे चाहत्याकडून ही मागणी वारंवार होत होती. 'सत्याचा विजय होतो' असे ट्वीट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने केले आहे.

त्याचप्रमाणे सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने या निर्णयानंतर देवाचे आभार मानले आहेत, 'सत्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. सीबीआयवर पूर्ण विश्वास आहे', असे ट्वीट श्वेताने केले आहे.

याप्रकऱणी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. सुनावणी करणरे न्यायाधीश ऋषिकेश रॉय यांनी सर्व पक्षांचे युक्तिवाद संक्षिप्त लिखित नोट स्वरूपात 13 ऑगस्टपर्यंत जमा करण्यास परवानगी दिली होती. सर्व पक्षांनी 13 ऑगस्टपर्यंत जबाब दाखल केला होता. ज्यावर न्यायालयाने आज निर्णय दिला आहे. सीबीआयची एसआयटी टीम आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबईकडे रवाना होणार आहे.

(हे वाचा-मृत्यू प्रकरणानंतर रिया चक्रवर्तीला मोठा झटका; फिल्ममध्ये मिळणार नाही काम)

दरम्यान महाराष्ट्र सरकार आणि रिया चक्रवर्तीने याप्रकरणी दाखल करण्यात आलेली एफआयआर मुंबई पोलिसांकडे सोपावण्यात यावी अशी मागणी केली होती. सुशांतचे वडील आणि बिहार सरकारने याचा विरोध केला होता. सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये रियाने सुशांतला त्रास दिल्याचा, त्याचे कोट्यवधी रुपये हडपल्याचा आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. सुप्रीम कोर्टाच्या  निर्णयाआधी बिहार सरकारने ही केस सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत एफआयआर दाखल केल्यानंतर त्याच्या आधारावर सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते. महाराष्ट्र सरकारने याचा विरोध केला होता.

(हे वाचा-"सुशांतच्या बहिणीने नशेत मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", रियाचा खळबळजनक आरोप)

अभिनेत्री रिया चक्रवर्तीकडून लेखी जबाब देखील नोंदवण्यात आला होता. यामध्ये तिने असे म्हटले होते की सुशांतच्या मृत्यूशी तिचा काही संबंध नाही आहे. त्याचप्रमाणे पाटणामध्ये केस दाखल करणे चुकीचे आहे. हे बिहार पोलिसांचे जुरिडिक्शन नाही आहे आणि अशाप्रकारे सीबीआयकडे प्रकरण हस्तांतरित करणे देखील योग्य नाही. यामध्ये तिने असे म्हटले आहे की बिहार पोलिसांनी एफआयआर दाखल केली आणि केस सीबीआयकडे दिली, जुरिडिक्शन शिवाय हे सारे घडले आहे. अशावेळी प्रकरण मुंबईमध्येच हस्तांतरित केले जावे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 19, 2020, 11:20 AM IST

ताज्या बातम्या