SSR Death Case : NCB ची मोठी कारवाई, मुंबई आणि गोव्यात मारले छापे

SSR Death Case : NCB ची मोठी कारवाई, मुंबई आणि गोव्यात मारले छापे

रियाने दिलेल्या माहितीतून अनुज केशवानीला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून अनेक नाव समोर आली आहे.

  • Share this:

गोवा, 12 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज आणि मृत्यूप्रकरणी अटक केलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई बरोबर गोव्यात छापे टाकणे सुरू केले असून प्रामुख्याने उत्तर गोव्यातील अंजुना इथं छापे टाकण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

यापूर्वी रिया चक्रवर्तीच्या मोबाईल चॅटमध्ये नाव आलेल्या गौरव आर्या आणि त्याच्या संबंधित ठिकाणी हे छापे असण्याची शक्यता आहे. यावेळेस आणखीन काही व्यक्तींची माहिती मिळविण्यात येत असून त्याच्याकडून अधिकचा तपशील शोधण्यात येणार आहे.

...हा तर आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान, शिवसेनेनं आठवलेंना 'नग' म्हणून सुनावले

गोव्यात ड्रग्स डीलर अनुज केशवानी याने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.  6 ठिकाणी छापे मारण्यात आले आहे. या सहा ठिकाणी ड्रग्स माफियांकडून पार्टीचे आयोजन केले जात होते. या कारवाईत आतापर्यंत 2 जणांना ताब्यात घेतले आहे.

रियाने दिलेल्या माहितीतून  अनुज केशवानीला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून अनेक नाव समोर आली आहे. या बरोबरच नव्याने गौरव आर्याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

रियाने चौकशीत घेतली 2 स्टार अभिनेत्यांची नावं!

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या रिया चक्रवर्ती हिने NCB समोर धक्कादायक खुलासे केले असल्याची माहिती समोर येत आहे. NCB ने CNN-NEWS18 ला दिलेल्या माहितीनुसार, रियाने एनसीबीला दिलेल्या 20 पानांच्या कबुली जबाबात गंभीर खुलासे केले आहेत. तिचं विधान 16/2020 च्या प्रकरणात नोंदवलं गेलं आहे. रियाच्या कबुलीनंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागणार आहे. कारण, यामध्ये रियाने अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांची नावं घेतली असल्याची माहिती आहे.

रियाने केलेले खुलासे हे एनडीपीएस अधिनियम कायदा 67 अन्वये अंतर्गत आहेत. रियाच्या कबुलीजबाबानुसार, बॉलिवूडमधील अनेकांनी सुशांतबरोबर ड्रग्जचं सेवन केलं होतं. ही पार्टी नेमकी कुठे झाली होती. याचीही माहिती रियाने चौकशीत दिली आहे.

लोणावळा इथल्या सुशांतच्या फार्म हाऊस बॉलिवूडमधील त्याच्या मित्रांनी ड्रग पार्टी वापरला होता. तर या पार्टीमध्ये रियासुद्धा होती का? असा सवाल केला असता तिने आपण या पार्टीमध्ये नसल्याचं सांगितलं आहे. यावेळी रियाने 2 प्रसिद्ध पुरुष कलाकारांची नावंही NCB दिली आहेत. यामध्ये तिने काही छोट्या कलांकारांचीही नावं घेतली आहे. ज्यांचा आता NCB कडून कसून तपास होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Published by: sachin Salve
First published: September 12, 2020, 11:09 AM IST
Tags:

ताज्या बातम्या