SSR Death Case: रियाचा भाऊ शोविकची ED कडून 18 तास चौकशी, पहिल्यांदा झाला युरोप दौऱ्याचा उल्लेख

SSR Death Case: रियाचा भाऊ शोविकची ED कडून 18 तास चौकशी, पहिल्यांदा झाला युरोप दौऱ्याचा उल्लेख

सलग दुसऱ्या दिवशी ईडीनं चौकशीसाठी बोलवलं असून तब्बल 18 तास त्याची चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 7 ऑगस्टला ईडीनं रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty)तब्बल 8 तास 30 मिनिटं चौकशी केली होती.

  • Share this:

मुंबई, 09 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीनंतर तिचा भाऊ शोविकची (Shauvik Chakraborty) चौकशी करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी ईडीनं चौकशीसाठी बोलवलं असून तब्बल 18 तास त्याची चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 7 ऑगस्टला ईडीनं रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty)तब्बल 8 तास 30 मिनिटं चौकशी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार शोविकच्या केलेल्या चौकशीत काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यावेळी सुशांतच्या बॅंक अकाउंटमधून शोविकच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेल्या रकमेबाबत चौकशी करण्यात आली.

सुशांतच्या बॅंक अकाउंटमधून शौविकच्या अकाउंटमध्ये अनेक वेळा पैसे ट्रान्फर करण्यात आले होते. एवढेच नाही तर दोन्ही कंपनी जिथे शोविक आणि रिया संचालक होते, त्याबाबतची चौकशी करण्यात आली. यावेळी शोविक चक्रवर्तीला ईडीने युरोप दौऱ्याबाबतही विचारले, यातून काही धक्कादायक माहिती समोर आली. शोविकनंतर ईडीकडून आता रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजीच चक्रवर्ती यांची चौकशी केली जाणार आहे.

वाचा-सुशांतचे 15 कोटी कोणत्या खात्यात वळवले? EDला रियाकडे मिळाली नाही रक्कम

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ईडीकडून मनी लाँड्रिंगच्या अँगलने ईडीकडून तपास केला जात आहे. शुक्रवारी रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी करण्यात आली. तब्बल 8 तास ही चौकशी सुरू होती. दरम्यान News18 च्या सूत्रांनुसार शुक्रवारी रियाने अशी माहिती दिली की तिच्या नावावर 3 कंपनी देखील आहेत.

वाचा-SSR Death Case: रियाचा भाऊ शोविकची सलग दुसऱ्या दिवशी ED कडून चौकशी

रियाने उत्तर देणे टाळले

याआधी रियाची चौकशी करण्यात आली. या चौकशीत न्यूज18 च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रियाचे बँक स्टेटमेंट, इनकम टॅक्स रिटर्न, उत्पन्नाचे साधन आणि बचत यासंदर्भात तिची चौकशी झाली. मात्र जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे 'मला माहित नाही' किंवा 'मला कसं तरी होत आहे', अशी दिली आहेत. त्याचबरोबर शुक्रवारी सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी हिची देखील चौकशी झाली. या प्रकरणी रियाच्या भावाची शनिवारी चौकशी करण्यात आली. तब्बल 18 तास ईडीकडून ही चौकशी सुरू होती अशी माहिती मिळाली आहे.

वाचा-SSR Death Case: वाद पेटला! बिहारचा FIR राजकीय हेतूने, मुंबई पोलिसांचा आरोप

चक्रवर्ती कुटुंबावर आरोपपत्र दाखल

सीबीआयने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती तसंच आई-वडिलांवर आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने आईपीसी कलम 306, 341, 342, 420, 406 अणि 506 अंतर्गत हे केस दाखल केली आहे. मीडिया अहवालांच्या मते सीबीआयकडून रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 9, 2020, 9:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading