मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच! सीबीआयने AIIMS चा अहवाल केला मान्य

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच! सीबीआयने AIIMS चा अहवाल केला मान्य

AIIMS ने त्यांच्या अहवालात अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. आता सीबीआयने देखील हे मान्य केले आहे की सुशांतने आत्महत्याच केली होती.

AIIMS ने त्यांच्या अहवालात अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. आता सीबीआयने देखील हे मान्य केले आहे की सुशांतने आत्महत्याच केली होती.

AIIMS ने त्यांच्या अहवालात अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. आता सीबीआयने देखील हे मान्य केले आहे की सुशांतने आत्महत्याच केली होती.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 07 ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये रोज नव्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की यामध्ये काही घातपाताचा प्रकार होता याविषयी सीबीआयकडून शोध घेतला जात आहे. याप्रकरणी AIIMS ने त्यांच्या अहवालात सुशांतने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. मीडिया अहवालाच्या मते आता सीबीआयने देखील हे मान्य केले आहे की सुशांतने आत्महत्याच केली होती. सीबीआयने अनेकदा त्यादिवशी नेमकं काय घडलं हा सीन रिक्रेएट केला आणि त्यानंतर ते या निर्णयावर पोहोचले आहेत की अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केली आहे. अमर उजालाने याबाबत वृत्त दिले आहे.

याप्रकरणाची पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी सीबीआयने एम्सकडून याप्रकरणात दुसऱ्यांदा तपास करण्यास सांगितले होते. एम्सच्या अहवालानुसार सुशांतने विष खाल्ले असावे असा कोणताही पुरावा मिळाला नाही आहे. त्याप्रमाणे ही घटना घातपाताचा प्रकार असावा याबाबतही कोणताही पुरावा मिळाला नाही आहे. ना त्याच्या शरिरावर कोणतीही जखम आढळली आहे ना ही त्याठिकाणी कुणी जबरदस्तीने शिरल्याचा पुरावा आहे. सीबीआय सूत्रांच्या मते याप्रकरणात सीबीआयने 24 हून अधिक  जणांची चौकशी केली आहे. यामध्ये त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, रियाचे आई-वडील, सुशांतच्या घरचे सदस्य, त्याचा स्टाफ, मॅनेजर आणि इतर काही बड्या व्यक्तींच्या नावाची चौकशी झाली आहे.

(हे वाचा-29 दिवसांनंतर रिया चक्रवर्ती तुरुंगातून येणार बाहेर, या अटींवर जामीन मंजूर)

एम्सच्या फॉरेन्सिक डॉक्टरांची टीम याप्रकरणी तपास करत होती. या टीमचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी असे म्हटले आहे की, 'आम्ही आमचा अंतिम अहवाल दिला आहे. हे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण आहे. त्याच्या शरीरावर गळफासाच्या निशाणाशिवाय कोणत्याही खुणा नाही आहेत. त्याच्या शरीरावर आणि कपड्यावर देखील झटापटीच्या खुणा नाही आहेत.'

ड्रग कनेक्शन प्रकरणात रियाला जामीन मंजूर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये आज सर्वात मोठी घडामोड घडली आहे. याप्रकरणी तुरुंगात असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) 29 दिवसांनी काही अटीशर्तींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे.

(हे वाचा-Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: नवरात्रीच्या एपिसोडमध्ये दयाबेन करणार कमबॅक?)

मात्र तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. याप्रकरणी अटकेत असणाऱ्या सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांचा जामीन अर्ज देखील खंडपीठाने मंजूर केला आहे. तर शौविकबरोबर अब्दुल बसीथ परिहारचा जामीन अर्थ फेटाळण्यात आला आहे. NDPS कायद्याच्या विविध तरतुदींनुसार त्यांच्याविरोधात एनसीबीने खटला दाखल केला होता.

First published:

Tags: Sushant Singh Rajput