मुंबई, 14 जून : चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने जगाचा निरोप घेऊन आता एक वर्ष झालं आहे. सुशांतच्या आता फक्त आठवणी आपल्यासोबत आहेत. सुशांतच्या फिल्मी करियरमध्ये क्रिकेटशी खास नातं होतं. मोठ्या पडद्यावर त्याचं करियर क्रिकेटपटूच्या भूमिकेतून सुरु झालं. त्यानंतर एमएस धोनीच्या बायोपिकमध्ये त्याने मुख्य भूमिका करत सर्वांचं मन जिंकलं.
सुशांतनं चेतन भगत (Chetan Bhagat) यांच्या ‘ द 3 मिस्टेक ऑफ माय लाईफ’ (The 3 Mistakes of My Life) या पुस्तकावर आधारित ‘काई पो चे’ (Kie Po Che!) या सिनेमात क्रिकेटपटू आणि खेळाडू म्हणून भूमिका केली होती. सुशांतने त्या सिनेमात अलीचा रोल करणाऱ्या दिग्विजय देशमुख (Digvijay Deshmukh) याला बॉलिंगची कोचिंग दिली होती. आता तोच दिग्विजय ‘रियल लाईफ’ मध्ये क्रिकेटचं मैदान गाजवत आहे.
मुश्ताक अली स्पर्धेतून पदार्पण
दिग्विजयनं 2019 साली सय्यद मुश्तार अली ट्रॉफी स्पर्धेतून टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचवर्षी डिसेंबर महिन्यात त्याने रणजी ट्रॉफीच्या माध्यमातून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. दिग्विजयला आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये मुंबई इंडियन्सनं करारबद्ध केलं होतं. दिग्विजयनं 1 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 6 तर 7 टी20 मॅचमध्ये 9 विकेट्स घेतल्या आहेत.
श्रीलंकेत द्रविडसोबत हा मुंबईकर असणार टीम इंडियाचा प्रशिक्षक!
दिग्वविजयनं मागच्या वर्षी सुशांतच्या आठवणी सांगितल्या होत्या. “सुशांत भैय्या सर्वात चांगल्या व्यक्तीपैकी एक होता. त्याने ‘काई पो चे’ मध्ये माझ्या कोचची भूमिका केली होती. तो एक चांगला क्रिकेटर होता. मी त्याला क्रिकेटमध्ये चांगलं खेळेन तेव्हा भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. मुंबई इंडियन्सनं निवड केल्यानंतर सुशांतला भेटण्याची माझी इच्छा होती. मात्र आता ते शक्य नाही.” अशी खंत दिग्विजयनं बोलून दाखवली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.