Home /News /entertainment /

अभिनेता सुशांत सिंह राजपूत सुसाईड, पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये झाला मोठा खुलासा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत सुसाईड, पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये झाला मोठा खुलासा

सुशांत गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता. मात्र, तो औषधी घेत नव्हता आणि तो मेडिटेशनही करत नव्हता.

    आशीष सिंह (प्रतिनिधी) मुंबई, 14 जून: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी सुशांत यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलं नाही. सुशांत यानं अचानक एक्झिट घेतल्यानंतर देशात मोठी खळबळ उडाली आहे. हेही वाचा...सुशांत सिंह आणि दिशाची एका पाठोपाठ आत्महत्या, धक्कादायक माहिती आली समोर! मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना दुपारी 2 वाजेच्या सुमारास सुशांत सिंह यानं आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. नंतर ते डीसीपी अभिषेक त्रिमुखे आणि वांद्रे पोलिस स्टेशनच्या इतर कर्मचाऱ्यासोबत सुशांत सिंह राजपूतच्या घरी गेले. पोलिसांनी पाहिलं की, सुशांतच्या घरी त्याची बहीण आणि तीन इतर लोक उपस्थित होते. सुशांत सिंह राजपूतची डेडबॉडी आधीच या लोकांनी खाली उतरवली होती. पोलिसांना सुशांतचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आहे. सुशांतचा स्वयंपाकी, क्रिएटिव्ह मॅनेजर आणि मॅनेजरचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे. अद्याप तरी सुशांत आत्महत्या प्रकरणात काही संशयास्पद आढळून आलं नसल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. डिप्रेशनमध्ये होता सुशांत, पण.. सुशांत सिंह राजपूतच्या क्रिएटिव्ह मॅनेजरनं पोलिसांना सांगितलं की, सुशांत गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता. मात्र, तो औषधी घेत नव्हता आणि तो मेडिटेशनही करत नव्हता. लॉकडाऊन लागू झाल्यापासून क्रिएटिव्ह मॅनेजर आणि मॅनेजर हे दोघे सुशांतच्या अपार्टमेंटमध्येच राहात होते. मॅनेजरनं सांगितलं की, रविवारी सकाळी 6 वाजता सुशांत नेहमीप्रमाणे उठला. त्याने 9.30 वाजेच्या सुमारात डाळिंबाचं ज्यूस प्यायलं आणि तो आपल्या खोलीत निघून गेला. दुपारच्या जेवणाचा मेनू विचारण्यासाठी स्वयंपाकीने 11.30 वाजता सुशांतच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. परंतु, सुशांतकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. .सुशांत झोपला असेल म्हणून स्वयंपाकी परत निघून आला. मात्र, दुपारी 1 वाजता सुशांतनं दरवाजा न उघडल्यानं स्वयंपाकीला संशय आला. त्यानं क्रिएटिव मॅनेजर आणि मॅनेजरला सांगितलं. दोघेही तातडीनं सुशांतच्या खोलीजवळ आले. त्यांनीही सुशांतच्या खोलीचा दरवाजा जोरजोरात ठोठावला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर या मॅनेजरनं गोरेगाव येथे राहणाऱ्या सुशांतच्या बहिणीला फोन करून ही माहिती दिली. तीही तातडीने सुशांतच्या घरी पोहोचली. चावीवाल्याच्या मदतीने सुशांतच्या खोलीचा दरवाजा उघडण्यात आला असता सुशांतचा मृतदेह सिलिंग फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आता. सगळ्यांनी सुशांतला खाली उतरवं. हेही वाचा...Sushant Suicide! ...अब शहर भर जिक्र मेरी खुदकुशी का, अनेकांच्या काळजाला धक्का दरम्यान, सुशांतचा फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मात्र, कोड लॉकमुळे फोन उघडता आला नाही. सुशांतचा फोन अनलॉक झाल्यानंतर महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते, असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिस सुशांतच्या मित्रांचीही चौकशी करणार असल्यांच बोललं जात आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Suicide, Sushant sing rajput, Sushant singh raajpoot

    पुढील बातम्या