मुंबई, 14 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या का केली, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे.
मोठ्या पडद्यावर महेंद्र सिंग धोणीची भूमिका साकारणारा सुशांत अशी अचानक एक्झिट घेईल यावर कुणाचाही विश्वास बसत नाही. अवघी बॉलिवूडनगरी सुशांतने उचलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे स्तब्ध झाली आहे. सुशांतने इतके टोकाचे पाऊल का उचलले ? याचा पोलीस तपास करतच आहे. पण, त्याआधी अशा काही घटना घडल्या आहे, त्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईतच एक मोठी पार्टी झाली होती. या पार्टीत सुशांत हजर होता. याच पार्टीत त्याची माजी मॅनेजर दिशा सॅलियन सुद्धा होती. ही पार्टी झाल्यानंतर आठवड्यापूर्वी सुशांतची दिशा सॅलियन हिने तिच्या राहत्या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.
कोण आहे रिया चक्रवर्ती? सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर होतेय तिची चर्चा
दिशा सॅलियनने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तिच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासाचा एक भाग म्हणून या पार्टीमध्ये जे कुणी सहभागी होते, त्या सर्वांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणाचा अजूनही तपास सुरू आहे.
दिशाच्या आत्महत्येमुळे सुशांतने Tweet करून भावना व्यक्त केल्या होत्या. 'दिशाची बातमी हादरवून टाकणारी आहे. तिच्या मित्रांना आणि कुटुंबाला माझ्याकडून भावपूर्ण सांत्वन', असं त्यानं लिहिलं होतं.
सुशांतने चंद्रावर खरेदी केलेली जागा; 'त्या' ठिकाणी जाण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं
त्यानंतर आज सुशांतने दुपारी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याच्या घरी त्याचे मित्रही आले होते. मित्रांसोबत दिवस घालवण्यानंतर दुपारी तो आपल्या खोलीत गेला, तो परत आलाच नाही. घरातील नोकराला सुशांतने गळफास घेतल्याचं आढळून आलं.
सुशांत नैराश्यग्रस्त
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत हा गेल्या काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त झाला होता. त्याच्यावर स्पेशल डॉक्टरांकडे उपचार सुरू होता. घरातून त्याच्या वैद्यकीय उपचाराची कागद पत्र आढळून आली आहे.
मुंबईत 'या' ठिकाणी राहात होता सुशांत, पाहा EXCLUSIVE PHOTOS
गेल्या काही दिवसात बॉलिवूडला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. अनेक मोठ्या सेलेब्रिटींनी अनपेक्षितपणे जगाचा निरोप घेतला आहे. सुरुवातीला इरफान खान आणि ऋषी कपूर यांनी दुर्धर आजाराशी झुंज देत शेवटी हार पत्करली. त्यानंतर साजिद- वाजिद या संगीतकार जोडीतले वाजिद खान यांचं कोरोनाव्हायरसमुळे निधन झालं.सुशांतच्या आत्महत्येमुळे हिंदी फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. अनेकांनी हा मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
आईसाठी भावूक पोस्ट
दरम्यान, सुशांतनं शेवटची पोस्ट ही आपल्या आईबाबत केली होती. सुशांतनं इनस्टाग्रामवर आईसाठी एक भावनिक कविता लिहिली होती.
सुशांत अनेकदा आपल्या सोशल मीडियावर कविता शेअर करतो, पण यावेळी त्याने आपल्या आईच्या आठवणीत लिहिलेली एक कविता शेअर केली होती. सुशांतनं यात त्याच्या आईसोबतचा फोटो कोलाज करून, "अश्रूंनी अंधुक झालेला भूतकाळ आणि हसतमुख क्षणभंगुर आयुष्य. या दोघांमधील संभाषण म्हणजे #आई", अशी भावनिक कविता शेअर केली होती.
संपादन - सचिन साळवे मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.