Home /News /entertainment /

Sushant Singh Suicide: सुशांतच्या आत्महत्येनंतर चाहत्यांनी करण आणि आलियाला सुनावलं, काय आहे नेमकं प्रकरण?

Sushant Singh Suicide: सुशांतच्या आत्महत्येनंतर चाहत्यांनी करण आणि आलियाला सुनावलं, काय आहे नेमकं प्रकरण?

सुशांतनं असं पाऊल का उचललं ? त्याला नेमकं कसलं नैराश्य होतं? असे सवाल उपस्थित झाले आहेत.

    मुंबई, 15 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनं फक्त बॉलिवूड नाही तर सारं देश शोक व्यक्त करत आहेय सुशांतनं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर सुशांतनं असं पाऊल का उचललं ? त्याला नेमकं कसलं नैराश्य होतं? असे सवाल उपस्थित झाले आहेत. यातच सोशल मीडियावर करण जोहर (Karan Johar) आणि आलिया भट (Alia Bhatt) ट्रेंड होत आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर चाहत्यांनी करण आणि आलियालं खरंखोटं सुनावलं आहे. करण आणि आलिया या दोघांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. त्यानंतर चाहत्यांनी करण आणि आलिया यांचे जुने व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली, ज्यात त्यांनी सुशांतची मस्करी केली होती. अनेकदा करण आणि आलियानं सुशांतची टीव्ही स्टार म्हणून मस्करी केली होती. वाचा-सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी नवी अपडेट, 'या' 8 लोकांची होणार चौकशी वाचा-Sushant Singh Suicide: 'महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही,केंद्राने तपास करावा' सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यानंतर करण जोहरनं आपल्या सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. यात त्याने सुशांतच्या आत्महत्येमुळे आपल्याला मोठा धक्का बसला आहे. आपण यासाठी दोषी असल्याचं सांगत अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही, असं करण म्हणाला. मात्र त्यानंतर नेटकऱ्यांनी करणला 'Hypocrite' म्हणून सुनावलं. तर काहींनी Nepotism चा प्रमोटर म्हटलं. वाचा-"अशी चूक पुन्हा करणार नाही", सुशांतच्या आत्महत्येनंतर करण स्वत:ला मानतोय दोषी करण जोहर म्हणाला, "मी स्वत:ला दोषी मानतो कारण गेली वर्षभर मी तुझ्या संपर्कात राहिलो नाही. तुला आपलं आयुष्यातील दु:ख शेअर करण्यासाठी कुणाचीतरी गरज आहे, असं मला अनेकदा जाणवलं. मात्र माझ्या भावनांना मी व्यक्त झालो नाही. अशी चूक मी पुन्हा कधीच करणार नाही. आपल्याला फक्त नातं बनवून फायदा नाही तर ते निभावणंही तितकंच गरजेचं आहे. सुशांतच्या निधनामुळे मला मोठा धक्का बसला आहे. सर्व नाती सांभाळण्याची गरज आहे, याची जाणीव मला करून दिली. मला तुझं ते गोड हसू आणि मिठी कायम लक्षात राहिल." वाचा-...आणि फोनवरून अंकिता लोखंडेला कळली सुशांतच्या आत्महत्येची बातमी तर आलिया भटनंही तुझ्या जाण्याची बातमीवर विश्वास नसून, मला फार वाईट वाटलं आहे, असं ट्वीट केलं. मात्र यावरही आलियाला चाहत्यांनी सुनावलं. दरम्यान, सुशांतची एक कमेंट सध्या व्हायरल होत आहे, ज्यात त्यानं चाहत्यांना त्याचे सिनेमा पाहण्याचे आवाहन केले होते. कारण त्याचा कोणी गॉडफादर नसल्यामुळं ब़ॉलिवूडमध्ये राहण्यासाठी त्याला फक्त चाहत्यांची गरज आहे. वाचा-‘छिछोरे’नंतर सुशांतकडून का काढून घेतले गेले 7 सिनेमे? संजय निरूपम यांचा सवाल
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Karan Johar, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या