#GlobalPrayersForSSR: सुशांतसाठी रामदेव बाबांचे 'होमहवन', राजपूत कुटुंबाला न्याय देण्याची केली मागणी

#GlobalPrayersForSSR: सुशांतसाठी रामदेव बाबांचे 'होमहवन', राजपूत कुटुंबाला न्याय देण्याची केली मागणी

सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्म्याला शांती मिळावी याकरता बाबा रामदेव यांनी हरिद्वारमध्ये होमहवन केले

  • Share this:

मुंबई, 15 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput Death) दोन महिन्यापूर्वी या जगाचा निरोप घेतला. आज 15 ऑगस्ट रोजी त्याच्यासाठी जगभरातून प्रार्थना केली जात आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने (Shweta Singh Kirti) स्वातंत्रदिनाच्या दिवशी एकत्र येण्याचे आणि सामुहिक स्वरुपात दिवंगत अभिनेत्यासाठी प्रार्थना (Global Prayers For SSR) करण्याचे आवाहन केले होते.  सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (Ankita Lokhnde) हिने देखील या प्रार्थनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

यामध्ये आता बाबा रामदेव (Baba Ramdev) देखील जोडले गेले आहेत. सुशांतच्या आत्म्याला शांती मिळावी याकरता त्यांनी हरिद्वारमध्ये होमहवन केले. बाबा रामदेव यांनी अशी माहिती दिली आहे की, 'मी सुशांतच्या बहिणी आणि कुटुंबीयांशी बातचीत केली, मी जेव्हा त्यांचे दु:ख ऐकले तेव्हा माझा आत्मा देखील थरारला. आम्ही सर्व पतंजली योगपीठमध्ये त्याच्या आत्म्यासाठी प्रार्थना करत आहोत. देव त्याच्या आत्म्यास शांती देवो, सुशांत आणि त्याच्या परिवाराला न्याय मिळो.'

(हे वाचा-कॅलिफोर्निया स्टेट असेंबलीकडून सुशांतचा सन्मान, बहिणीने घेतला पुरस्कार)

व्हिडीओमध्ये पुढे रामदेव बाबांनी असे म्हटले आहे की, 'आज आप स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आणि आपल्याला हे स्वातंत्र्य त्याकरता मिळाले आहे जेणेकरून सर्वांना न्याय मिळेल. कोणावरही कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही. बाबा रामदेव यांनी असे वक्तव्य केले आहे की, सुशांतचा जीव मारेकऱ्यांनी घेतला, आता त्याच्या आत्म्याला न्याय मिळाला पाहिजे.'

ते पुढे म्हणाले की, 'त्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा जे दारोदारी भटकून खस्ता खात आहेत. आमची हिच प्रार्थना असेल की लवकरच सुशांतला न्या मिळेल.' यावेळी बाबा रामदेव यांच्याबरोबर पतंजली योगपीठातील सदस्य सहभागी झाले होते.

(हे वाचा-सुशांतसाठी केली जातेय जगभरातून प्रार्थना, #GlobalPrayersForSSR ट्विटरवर ट्रेंड)

सुशांतच्या बहिणीसह त्याच्या लाखो चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली. सकाळी 10 वाजल्यापासून अनेकांनी सुशांतच्या आत्म्याच्या शांतीसाठी हात जोडून फोटो पोस्ट केले आहेत. यावेळी ट्विटर वर #GlobalPrayersForSSR ट्रेंड करत आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 15, 2020, 3:31 PM IST

ताज्या बातम्या