मुंबई, 08 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death) अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे नाव वारंवार समोर येत आहे. याप्रकरणी सुशांतचे वडील केके सिंह (KK Singh) यांनी देखील रियावर आणि तिच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान रियाच्या याचिकेविरोधात सुशांतच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर असा आरोप केला आहे की, तिने या प्रकरणातील साक्षीदारांना प्रभावित करण्यास सुरुवात केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रियाची याचिका फेटाळण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. जर रियाने स्वत: सीबीआय चौकशीची मागणी केली आहे, तर सीबीआय चौकशी का टाळली जात आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान सुशांतच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून अशी माहिती दिली आहे, 'रियाने या प्रकरणाला राजनैतिक रंग देत सुशांतच्या कुटुंबीयांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. सुशांतच्या खात्यातून खूप सारे पैसे काढण्यात आले आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या पैशांचे हक्कदार त्याचे वडील आहेत. त्यामुळे त्यांना पाटणामध्ये एफआयआर दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. रियाने जर सोशल मीडियाच्या माध्यमातून गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे, तर ती आता यापासून मागे का फिरत आहे? सीबीआय चौकशी होणेच योग्य आहे.'
(हे वाचा-'सुशांतची केवळ ही एकच संपत्ती माझ्याकडे आहे', रिया चक्रवर्तीचा दावा)
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाप्रकरणी रियाने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर 11 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सुशांत प्रकरणाचा तपास पाटणाहून मुंबईमध्येच हस्तांतरित केला जावा याबाबत तिने याचिका केली होती. बिहारमध्ये दाखल करण्यात आलेली एफआयआर मुंबईत ट्रान्सफर करण्याची मागणी रियाने केली आहे.
(हे वाचा-'मला कसं तरी होतंय, मला काही माहित नाही',EDच्या सर्व प्रश्नांवर रियाचे एकच उत्तर)
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant singh rajput suicide case) प्रकरणाचा तपास आता CBI कडे गेला आहे. CBI ने दाखल केलेल्या आरोपपत्रात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह (rhea chakraborty) सहा जणांविरुद्ध केस दाखल करण्यात आली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती, इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती या रियाच्या कुटुंबीयांबरोबर सॅम्युएल मिरांडा आणि श्रुती मोदी अशी दोन नावं आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.