Home /News /entertainment /

कंगनानंतर नेटिझन्सही दीपिकावर संतापले; सुशांत प्रकरणी एका पोस्टमुळे ट्रोल

कंगनानंतर नेटिझन्सही दीपिकावर संतापले; सुशांत प्रकरणी एका पोस्टमुळे ट्रोल

सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant singh rajput) मृत्यूनंतर दीपिका पादुकानने (deepika padukone) अशी पोस्ट केली होती, ज्यामुळे ट्रोलर्सनी तिला लक्ष्य केलं आहे.

    मुंबई, 20 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant sig=ngh rajput) मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींना ट्रोल केलं जाऊ लागलं. करण जोहर, एकता कपूर, महेश भट्ट, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा यांच्यावर निशाणा साधण्यात आला. दरम्यान आता अभिनेत्री दीपिका पादुकोणलाही (deepika padukon) लक्ष्य केलं जाऊ लागलं आहे. सोशल मीडियावर #RepeatAfterMe हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणने डिप्रेशनचा सामना केला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर तो डिप्रेशनमध्ये असल्याचं समजताच दीपिका सोशल मीडियावर याबाबत व्यक्त झाली. तिने सुशांतच्या मृत्यूला डिप्रेशन आणि मानसिक आरोग्याशी जोडलं. सोशल मीडियावर #RepeatAfterMe ही मोहीम सुरू केली. 14 जून म्हणजे सुशांतचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी दीपिका पादुकोणने ट्वीट केलं होतं. "ज्या व्यक्तीला मानसिक आजार आहे, त्याने बोलावं, संवाद साधावा, व्यक्त व्हावा, मदत मागावी. तुम्ही एकटे नाहीत हे लक्षात घ्या. आपण सर्व एकत्र आहोत आणि सर्वात महत्त्वाचं महत्त्वाचं म्हणजे आशा कायम ठेवा" हे वाचा - "डिप्रेशनचा धंदा करणाऱ्यांना औकात दाखवली", नाव न घेता कंगनाचा दीपिकावर निशाणा यानंतर 15 जून ते 21 जूनपर्यंत दीपिकाने Repeat after me म्हणत डिप्रेशन आणि मानसिक आरोग्याबाबत ट्वीट केले. त्यानंतर तिने याबाबत ट्वीट केलं नाही. मात्र आता सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि या प्रकरणाला मानसिक आरोग्याशी जोडणाऱ्या दीपिकाला ट्रोल करण्यात आलं. हे वाचा - सुशांत-सारा होते एकमेकांच्या प्रेमात, बॉलिवूड माफियाच्या दबावामुळे केला ब्रेकअप? "दीपिका ही डिप्रेशन तज्ज्ञ आहे काही वर्षांपूर्वी ती डिप्रेशनमध्ये होते. मलादेखील चौथीत असताना एक जंगली माकड चावलं होतं. म्हणजे मीदेखील वन्यजीव तज्ज्ञ आहे. Repeat after me माकडाचा चावा खरा होता. तुम्हीदेखील कोणत्या समस्येचा सामना केला आहे ज्याचे तुम्ही आता तज्ज्ञ झाला आहे, ते मला सांगा आणि #RepeatAfterMe हा हॅशटॅग वापरा" असं ट्वीट एका युझरने केलं. यावर अनेक युझर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर #RepeatAfterMe हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. हे वाचा - "सुशांतच्या नावाने निधी मागताना लाज वाटत नाही", एकता कपूरवर भडकले सुशांतचे चाहते ट्रोलर्सनी याआधी निर्माती एकता कपूरलाही ट्रोल केलं. सुशांतच्या फोटोचा वापर करून त्याने काम केलेल्या पवित्र रिश्ता मालिकेच्या नावाने मानसिक आरोग्यासाठी पवित्र रिश्ता फंड सुरू करण्यात आला. सुशांतच्या नावाने निधी मागायला लाज वाटत नाही का, असं म्हणत नेटिझन्सनी एकतावर निशाणा साधला. त्यानंतर एकताने याबाबत स्पष्टीकरण देत या फंडमधून माघार घेतली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या