Home /News /entertainment /

सुशांतच्या वडिलांच्या वकिलांचा खळबळजनक दावा; CBI वरच उपस्थित केले प्रश्न

सुशांतच्या वडिलांच्या वकिलांचा खळबळजनक दावा; CBI वरच उपस्थित केले प्रश्न

SSR case : 'सुशांतचे मृत्यूनंतरचे फोटो पाहून AIIMS च्या एका डॉक्टरांनी ही 200 टक्के हत्या असल्याचं सांगितलं होतं', असा दावा वकील विकास सिंह यांनी केला आहे. सुशांतचा परिवार CBI च्या तपासावर नाराज असल्याचंही ते म्हणाले.

  पाटणा, 25 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करणाऱ्या CBI ने अद्याप कुठलीच माहिती जाहीर का केली नाही. सुशांतने आत्महत्या केली की त्याचा खून झाला हेसुद्धा त्यांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही, असे प्रश्न विचारत सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी आज खळबळजनक दावा केला. 'सुशांतचे मृत्यूनंतरचे फोटो पाहून AIIMS च्या एका डॉक्टरांनी ही 200 टक्के हत्या असल्याचं सांगितलं होतं. ही आत्महत्या असूच शकत नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. मग CBI आत्महत्या नसून हत्या असल्याच्या दिशेने तपास का करत नाही', असं विधान विकास सिंह यांनी शुक्रवारी केलं. ते सुशांतचे वडील के. के.सिंह यांचे वकील आहेत. यासंबंधी News18 ने दिलेल्या बातमीत विकास सिंह यांचं विधान सविस्तर देण्यात आलं आहे. CBI च्या तपासाप्रकरणी आपण समाधानी नाही, असं या वकिलांचं म्हणणं आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी नार्कोटिक्स विभागानेही चौकशी सुरू केली आहे. रियाला अटकही केली आहे. पण NCB च्या तपासातून सत्य बाहेर येणार नाही, असं विकास सिंह यांचं म्हणणं आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि अन्य मोठ्या तारे-तारकांना चौकशीसाठी बोलावून फक्त मूळ प्रकरणावरून लक्ष दुसरीकडे वेधलं जाणार आहे, असा आरोप विकास सिंह यांनी केला. CBI ने आत्तापर्यंतच्या तपासासंदर्भात एकदाही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही. त्यांनी बैठकासुद्धा घेतलेल्या नाहीत. CBI आणि NCB या दोन्ही केंद्रीय संस्थांच्या तपासाबद्दल सुशांतच्या कुटुंबाच्या वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतचा परिवार या तपासाबाबत नाराज असल्याचं ते म्हणाले. "रिया चक्रवर्तीची चौकशी झाली, तेव्हा तिने ड्रग्ज विकत घेतल्याचं कबूल केलं. पण तिने सुशांतसाठी ड्रग्ज घेतल्याचा दावा केला. आता सुशांत या जगात नाही. त्यामुळे ती खरं बोलते आहे की नाही, हे कोण ठरवणार? आरोपी रिया स्वतःसाठी ड्रग्ज घेत नव्हती कशावरून? ती सुशांतला ड्रग्ज द्यायची तर ते चहा-कॉफीबरोबर द्यायची की आणखी कसे... यातलं खरं-खोटं कोण सांगणार", असा सवाल विकास सिंह यांनी केला.
  .
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या