Home /News /entertainment /

सुशांतच्या गळ्यावर असलेल्या त्या खुणा कसल्या? पोस्टमॉर्टेमचा दुसऱ्यांदा अभ्यास करताना उपस्थित झाले प्रश्न

सुशांतच्या गळ्यावर असलेल्या त्या खुणा कसल्या? पोस्टमॉर्टेमचा दुसऱ्यांदा अभ्यास करताना उपस्थित झाले प्रश्न

SSR case : गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्याच्या गळ्यावर अशा खुणा असणं अपेक्षित नसल्याचं मत पोस्टमार्टम रिपोर्टचा दुसऱ्यांदा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

    मुंबई, 7 सप्टेंबर : सुशांतच्या गळ्याभोवती असलेल्या खुणांवरून त्याच्या पोस्टमार्टेम रिपोर्टबद्दल संशय व्यक्त करण्यात येतो आहे. आता काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, CBI ने AIIMS च्या डॉक्टरांना सुशांतचा शवविच्छेदन अहवाल दाखवला होता. त्यावर AIIMS च्या डॉक्टरांनी या अहवालाबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सुशांतच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर काही तासातच व्हायरल झाले होते. पंख्याला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच सुशांतचा मृतदेह खाली काढून ठेवण्यात आला होता. सुशांतच्या गळ्यावर खुणा होत्या. गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्याच्या गळ्यावर अशा खुणा असणं अपेक्षित नसल्याचं मत काही डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. E24 ने यासंबंधी एक बातमी दिली आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाला सुशांतचा पोस्टमार्टेम रिपोर्ट पुन्हा अभ्यासण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानुसार तो तपासला गेल्यानंतर एम्सच्या तज्ज्ञांनी हे पोस्टमार्टेम करणाऱ्या डॉक्टरांबद्दल काही प्रश्न उपस्थित केल्याचं समजतं. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला ड्रग्जच्या अँगलमुळे आता नवं वळण मिळालं आहे. याप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या भावाला- शोविक चक्रवर्ती याला NCB ने अटक केली आहे. याशिवाय सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडासुद्धा NCB च्या अटकेत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर 14 जून रोजी त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. दुपारी आणलेल्या सुशांतच्या मृतदेहाचे रात्रीपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले होते. अशात हा सवाल उपस्थित केला जात आहे की सुशांतचे शवविच्छेदन करण्यासाठी इतकी घाई का करण्यात आली. शवविच्छेदनानंतर सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आला होता. व्हिसेरा रिपोर्टचा तपास करणाऱ्या एम्सच्या मेडिकल टीमला या प्रकरणात काही गोष्टी खटकल्या आहेत. AIIMS ची फॉरेंसिक टीम ही सुरक्ष‍ित ठेवण्यात आलेली सुशांतची व्हिसेरा टेस्ट पडताळून पाहत आहे. मेड‍िकल टीमला संशय आहे की सुशांतला विष देण्यात आलं होतं. AIIMS च्या फाॅरेंसिक डिपार्टमेंटचे हेड आणि सुशांत केससाठी गठीत केलेल्या मेड‍िकल बोर्डाचे चेअरमॅन डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितले की येत्या 10 दिवसात याचा तपास करण्यात येणार असून रिपोर्टही तत्काळ मिळेल. या प्रकरणाबाबत मेडिकल बोर्डाची पुढली बैठक 17 सप्टेंबर रोजी होईल.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या