SSR Death Case: रियाचा भाऊ शोविकची सलग दुसऱ्या दिवशी ED कडून चौकशी

SSR Death Case: रियाचा भाऊ शोविकची सलग दुसऱ्या दिवशी ED कडून चौकशी

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ईडीकडून मनी लाँड्रिंगच्या अँगलने ईडीकडून तपास केला जात आहे.

  • Share this:

मुंबई, 09 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीनंतर आता तिचा भाऊ शोविकची चौकशी केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी ईडीनं चौकशीसाठी बोलवलं असून तब्बल 18 तास त्याची चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 7 ऑगस्टला ईडीनं रिया चक्रवर्तीची तब्बल 8 तास 30 मिनिटं चौकशी केली होती. या चौकशीत न्यूज18 च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रियाचे बँक स्टेटमेंट, इनकम टॅक्स रिटर्न, उत्पन्नाचे साधन आणि बचत यासंदर्भात तिची चौकशी करण्यात आली.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ईडीकडून मनी लाँड्रिंगच्या अँगलने ईडीकडून तपास केला जात आहे. शुक्रवारी रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी करण्यात आली. तब्बल 8 तास ही चौकशी सुरू होती. दरम्यान News18 च्या सूत्रांनुसार शुक्रवारी रियाने अशी माहिती दिली की तिच्या नावावर 3 कंपनी देखील आहेत. मात्र इतर प्रश्नांची उत्तरे देणे तिने टाळले आहे.

हे वाचा-SSR Death Case: वाद पेटला! बिहारचा FIR राजकीय हेतूने, मुंबई पोलिसांचा आरोप

जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे 'मला माहित नाही' किंवा 'मला कसं तरी होत आहे', अशी दिली आहेत. त्याचबरोबर शुक्रवारी सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी हिची देखील चौकशी झाली. या प्रकरणी रियाच्या भावाची शनिवारी चौकशी करण्यात आली. तब्बल 18 तास ईडीकडून ही चौकशी सुरू होती अशी माहिती मिळाली आहे

सीबीआयने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती तसंच आई-वडिलांवर आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने आईपीसी कलम 306, 341, 342, 420, 406 अणि 506 अंतर्गत हे केस दाखल केली आहे. मीडिया अहवालांच्या मते सीबीआयकडून रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 9, 2020, 7:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading