"14 जूनला सुशांतच्या घरी फक्त मीतू दीदी होती", अनेक आरोपांनंतर अखेर संदीप सिंहने मौन सोडलं

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यूप्रकरणी त्याचा मित्र आणि चित्रपट निर्माता संदीप सिंह (sandip singh) हाच मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जातो आहे.

  • Share this:

मुंबई, 06 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यूप्रकरणी त्याचा मित्र आणि चित्रपट निर्माता संदीप सिंहदेखील (sandip singh) संशयाच्या घेऱ्यात आहे. संदीप या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचं म्हटलं जातं आहे. 14 जूनला सुशांतच्या मृत्यूनंतर रुग्णवाहिका चालकाला कित्येक वेळा फोन, शिवाय डिसेंबर 2019 मध्ये भाजप कार्यालयात केलेले फोन यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत असातना आता संदीप सिंहने अखेर मौन सोडलं आहे.

संदीप सिंह सुशांतच्या संपर्कात नव्हता, तो सुशांतच्या कुटुंबालाही ओळखत नव्हता, त्याचं भाजपशी कनेक्शन आहे, असे कित्येक प्रश्न संदीप सिंहबाबत उपस्थित करण्यात आले. त्याची सीबीआय चौकशीदेखील सुरू आहे. दरम्यान संदीप सिंहने आता आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याने अनेक खुलासे केले आहेत.

संदीपने ही पोस्ट सुशांतला उल्लेखून केली आहे. संदीप म्हणाला, "14 जूनला जेव्हा मला तुझ्या निधनाची बातमी समजली तेव्हा मी स्वत:ला रोखू शकले नाही मी लगेच तुझ्या घरी गेलो. मात्र तिथं मीतू दीदीशिवाय दुसरं कुणीच नव्हतं हे पाहून मला आश्चर्य वाटलं. त्या कठीण परिस्थितीत तुझ्या बहिणीच्या बाजूने उभं राहणं चुकीचं होतं की तुझ्या इतर मित्रांची वाट मी पाहायला हवी होती, याचा विचार मी अजूनही करतो आहे"

हे वाचा - आई होण्याबाबत काय म्हणाली अंकिता लोखंडे; शेअर केली इमोशनल पोस्ट

संदीपने सुशांतच्या मृत्यूनंतर सुशांतची बहीण मीतूला केलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉटही टाकला आहे. 15 जून ते 20 जूनपर्यंत दोघांमधील संवाद आहे. या मेसेजचा स्क्रिनशॉट टाकून संदीपने आपण अॅम्ब्युलन्स चालकाला फोन का केला, याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

संदीप म्हणाला, प्रत्येक जण म्हणतो तुझं कुटुंब मला ओळखायचं नाही. हो बरोबर आहे. मी तुझ्या कुटुंबाला कधीच भेटलो नाही. भावाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या एकट्या पडलेल्या बहिणीला तिच्या दु:खाच्या वेळी मदत करणं ही माझी चूक होती का? मी वारंवार एम्ब्युलन्स चालकाला फोन का केला याबाबत माझ्यावर असलेला संशयही मला मिटवायचा आहे"

हे वाचा - 'संजयजी तुम्ही महाराष्ट्र नाही म्हणत कंगना भडकली; दिलं खुलं चॅलेंज

संदीप सिंह हा 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचा निर्माता आहे. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही संदीप सिंहचे फोटो आहेत. त्यामुळे संदीप सिंह यांचे भाजप कनेक्शन काय आहे? असा सवाल काँग्रेसनं केला आहे. त्याचप्रमाणे सचिन सावंत यांनी संदीप सिंहचे फडणवीसांसोबतचे फोटो शेअर करुन, भाजपच्या अँगलवरुनही चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुशांतसिंह प्रकरणात संदीप सिंहवरही मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप होत आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चॅटवरुन ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर भाजपकडून सरकारवर हल्लाबोल सुरु आहे.

Published by: Priya Lad
First published: September 6, 2020, 8:41 PM IST

ताज्या बातम्या