"मला आत्महत्या करावीशी वाटली", पहिल्यांदाच व्यक्त झाली रिया चक्रवर्तीची आई

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह (rhea chakraborty) तिचं कुटुंब अडचणीत सापडल्यानंतर रियाची आई संध्या चक्रवर्तीने (Sandhya Chakraborty) पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 08 ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिचं कुटुंब अडचणीत सापडल्यानंतर तिची आई संध्या चक्रवर्तीने (Sandhya Chakraborty) पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सुशांतच्या कुटुंबाने रियाच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर चक्रवर्ती कुटुंबासाठी हा कठीण असा काळ. गेले काही महिने चक्रवर्ती कुटुंब कोणत्या परिस्थितीतून गेलं याबाबत रियाच्या आईने पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. या सर्व परिस्थितीमुळे आपल्याला आत्महत्या करावीशी वाटली असं तिनं सांगितलं.

28 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर रिया घरी पोहोचली. त्यानंतर तिला पाहून तिच्या आईला रडू कोसळलं. देव आहे, असे शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडले. मात्र शोविक अजूनही तुरुंगात आहे आणि रिया या परिस्थितीतून बाहेर कशी येणार याची चिंता आता तिला सतावते आहे, असं असं रियाची आई टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाली.

संध्या म्हणाल्या, "मुलं जेलमध्ये असल्याने माझी झोप उडाली होती. मी बेडवर शांतपणे झोपू शकत नव्हते, रात्रभर जागे असायचे. काहीच खावं-प्यावंसं वाटायचं नाही. रात्री मनात काय काय विचार यायचे आणि मी  अचानक उठून बसायचे.  यादरम्यान माझ्या मनात आत्महत्येसारखे विचारही आले. ज्यामुळे मला थेरेपी घ्यावी लागली. असे विचार आल्यानंतर मला माझ्या मुलांसाठी जगायचं आहे, म्हणून स्वतःला खंबीर बनवलं"

हे वाचा - रिया चक्रवर्तीने कसे घालवले जेलमध्ये 28 दिवस; काय काय करायची अभिनेत्री पाहा

रिया चक्रवर्ती घरी परतल्यानंतर तिला पाहून तिच्या आईला आनंद झाला मात्र मनात चिंतेनं घर केलं आहे. रिया या सर्व परिस्थितीतून कशी बाहेर पडेल याची चिंता तिच्या आईला आता सतावून लागली आहे.

संध्या म्हणाल्या, "रिया घरी आल्यानंतर मला दिलासा मिळाला. मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतो. तिनं इतकं काही सहन केलं आहे तरी जेव्हा ती घरी आली तेव्हा म्हणाली, तू दुःखी का आहेस, आपल्याला मजबूत बनवून लढाई लढायची आहे. मात्र ती ज्या परिस्थितीतून गेली त्या भयंकर स्वप्नातून ती बाहेर कशी पडणार, याची चिंता आहे. रियाच्या डोक्यातून हे सर्व बाहेर काडण्यासाठी मला तिची थेरेपी करून घ्यावी लागेल"

हे वाचा - अनुराग कश्यपवर आरोप करणारी पायल पुन्हा अडचणीत येणार? ऋचा चड्ढाबाबत केलं ट्वीट

"अजूनही सर्वकाही संपलं नाही. माझा मुलगा अजून जेलमध्ये आहे आणि हा सर्व विचार करून मला वेड लागत आहे. आजही दरवाजाची घंटी वाजल्यानंतर काळजात धडकी भरते, आम्हाला भीती वाटते. कधी कोण येईल आम्हाला माहिती नसतं. अनेकदा रिपोर्टर सीबीआय असल्याचं सांगत आमच्या बिल्डिंगमध्ये घुसतात. यामुळे आम्हाला दरवाजाबाहेर सीसीटीव्ही लावण्याची वेळ आली", असं संध्या यांनी सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: October 8, 2020, 4:15 PM IST

ताज्या बातम्या