11 वर्षांपूर्वीच ड्रग्जबाबत रिया चक्रवर्तीने केलं होतं TWEET; अटकेनंतर होतंय व्हायरल

11 वर्षांपूर्वीच ड्रग्जबाबत रिया चक्रवर्तीने केलं होतं TWEET; अटकेनंतर होतंय व्हायरल

अभिनेत्री रिया चक्रवर्तीचं (Rhea Chakraborty) ड्रग्जबाबत हे TWEET पाहून तिची भविष्यवाणी खरी ठरली अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 08 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh rajput) प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपासात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) अखेर अटक झाली. अटकेच्या काही तासांतच रियाचं जुनं ट्वीट व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये रियाने ड्रग्जचा उल्लेख केला होता. रियाचं हे ट्वीट 11 वर्षांपूर्वीचं आहे.

रिया चक्रवर्तीने 2009 साली एक ट्वीट केलं होतं. ज्यामध्ये तिने ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुरुंगात जाणाऱ्या भारतीय मुलीचा उल्लेख केला होता. रिया म्हणाली, "नुकतीच एका भारतीय मुलीच्या एका भयानक कथेतून बाहेर आले. जिनं अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी चार वर्षे तुरुंगवास भोगला"

रियाचं हे ट्वीट 19 नोव्हेंबर, 2009 चं आहे. रियाचं हे ट्वीट अकरा वर्षे जुनं आहे. हे ट्वीट पाहताच नेटिझन्सनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी रियाने आपल्याबाबतच भविष्यवाणी केली होती, जी आज खरी ठरली आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

रिया चक्रवर्तीला (rhea chakraborty) अनेक तासांच्या चौकशीअंती अटक केली आहे. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यापूर्वीच NCB च्या अटकेत आहेत.

हे वाचा - "हो मी ड्रग्ज घ्यायचे", अभिनेत्री कंगना रणौतचा VIDEO VIRAL

सुशांतची गर्लफ्रेंड रिया आणि तिचा भाऊ शोविक नियमितपणे ड्रग्ज खरेदी करायचे असा आरोप होता. सुशांतसाठी ड्रग्ज घेत असल्याचं शोविकने सांगितलं होतं. आतापर्यंत रिया चक्रवर्तीने आपण कधीच अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही, असं सांगत होती. पण आज सलग तीन दिवसांच्या चौकशीनंतर रियाने प्रथमच ड्रग्ज घेत असल्याची कबुली दिली. इतकंच नाही तर रियाने एनसीबीला ड्रग्स घेतल्या जाणाऱ्या बॉलिवूड पार्ट्यांबाबत माहिती दिली. आता NCB ड्रग्स प्रकरणात सुशांतचे सहकलाकार आणि अभिनेत्यांसह 25 बॉलिवूड कलाकारांना समन्स पाठवणार आहे.

हे वाचा - .....म्हणून ठरवूनही उद्या मुंबईत येऊ शकणार नाही कंगना, निर्माण झालं नवं संकट

रिया चक्रवर्तीला न्यायालयात हजर केलं जाणार असून अंमली पदार्थ प्रतिबंध कायदा 27 (अ) हे अजामीनपात्र कलम लावण्यात आल्याने रियाला NCB कोठडी संपल्यावर लवकरात लवकर जामीन मिळणार नाही, असा हा कायदा सांगतो. त्यामुळे रियाला पुढील काही दिवस NCB कोठडीत आणि नंतर जेलमध्ये काढावे लागणार हे नक्की.

Published by: Priya Lad
First published: September 8, 2020, 9:37 PM IST

ताज्या बातम्या