8 तासांच्या चौकशीनंतर रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयाबाहेर; काय काय झाले खुलासे?

8 तासांच्या चौकशीनंतर रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयाबाहेर; काय काय झाले खुलासे?

रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) तब्बल 8 तास 30 मिनिटं ED चौकशी झाली.

  • Share this:

मुंबई, 07 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मृत्यूप्रकरणी (Sushant singh rajput demice) सक्तवसुली संचालनालयाने (ED) त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) चौकशी केली. रियाची तब्बल 8 तास 30 मिनिटं चौकशी झाली. न्यूज18 च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रियाचे बँक स्टेटमेंट, इनकम टॅक्स रिटर्न, उत्पन्नाचे साधन आणि बचत यासंदर्भात तिची चौकशी करण्यात आली.

ईडीने रियाकडून तिच्या मालमत्तेची कागदपत्रं मागितली होती. मात्र रियाने आपली मालमत्तेची कागदपत्रं ईडीसमोर सादर केली नाहीत. तिनं आपली कागदपत्रं सीए रितेश शाहकडे असल्याचं सांगितलं मात्र रितेश शाह यांनीदेखील आपल्याकडे कागदपत्रं असल्याचं नाकारलं. त्यानंतर रियाने आपण कागदपत्रं कुठे ठेवलीत हे आठवत नसल्याचं सांगितलं.

अत्यंत कमी उत्पन्न असतानाही रिया चक्रवर्तीने मुंबईत 2 प्रॉपर्टी खरेदी केल्या. यामध्ये एक रिया आणि दुसरी प्रॉपर्टी तिच्या कुटुंबीयांच्या नावावर आहे. रियाने या दोन्ही प्रॉपर्टीसाठी कुठून पैसे दिले त्याबाबत अद्याप माहिती समोर आली आहे. काहीतरी गोंधळ असल्याचे लक्षात आल्यावर ईडीने या प्रॉपर्टीचे कागदपत्र मागितली.

हे वाचा - सुशांतच्या डायरीतील पानं कुणी फाडली? महत्त्वाचे पुरावे मिटवल्याचा संशय

रियासह तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, वडील इंद्रजीत चक्रवर्ती आणि सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रियासह भाऊ, वडील, श्रुती मोदी आणि रियाचा सीए रितेश शाह यांचीही चौकशी झाली.

New18 च्या सूत्रांच्या माहितीनुसार, रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीच्या (Showik Chakraborty) खात्यात सुशांतच्या खात्यातून करोडो रुपये ट्रान्सफर झाल्याचं स्पष्ट होत आहे, तशा नोंदी आहेत. कोटक बँकेतून या पैशांचा व्यवहार झाल्याचं या अकाउंट्सवरून स्पष्ट होतं.

दरम्यान रिया, शौविक, इंद्रजीत आणि श्रुती मोदी यांची पुन्हा सोमवारी चौकशी होणार आहे. त्यांना चौकशीसाठी सोमवारी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

हे वाचा - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण: भाजपने केली या परदेशी महिलेच्या चौकशीची मागणी

सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह (KK Singh) यांनी पाटणा पोलिसांमध्ये रिया आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर दाखल केली होती. सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा, त्याला त्याच्या कुटुंबीयांपासून दूर ठेवल्याचा त्याचप्रमाणे पैशांच्या अफरातफरीचा आरोप त्यांनी यामध्ये केला होता. रियाने सुशांतच्या खात्यातून 15 कोटी काढल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला होता.

Published by: Priya Lad
First published: August 7, 2020, 10:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading