मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'मला कसं तरीच होतंय, मला काही माहित नाही', ED च्या जवळपास सर्व प्रश्नांवर रियाचे एकच उत्तर

'मला कसं तरीच होतंय, मला काही माहित नाही', ED च्या जवळपास सर्व प्रश्नांवर रियाचे एकच उत्तर

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput Death) प्रकरणी ईडीने शुक्रवारी रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) चौकशी केली. यावेळी विचारण्यात आलेल्या बहुतांश प्रश्नांचे उत्तर रियाने एकतर 'माहित नाही' असे दिले आहे किंवा 'मला कसं तरी होतंय', असे दिले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput Death) प्रकरणी ईडीने शुक्रवारी रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) चौकशी केली. यावेळी विचारण्यात आलेल्या बहुतांश प्रश्नांचे उत्तर रियाने एकतर 'माहित नाही' असे दिले आहे किंवा 'मला कसं तरी होतंय', असे दिले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput Death) प्रकरणी ईडीने शुक्रवारी रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) चौकशी केली. यावेळी विचारण्यात आलेल्या बहुतांश प्रश्नांचे उत्तर रियाने एकतर 'माहित नाही' असे दिले आहे किंवा 'मला कसं तरी होतंय', असे दिले आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 08 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput Death) प्रकरणी ईडीने काल तब्बल 8 तास त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) चौकशी केली. यावेळी विचारण्यात आलेल्या बहुतांश प्रश्नांचे उत्तर रियाने एकतर 'माहित नाही' असे दिले आहे किंवा 'मला कसं तरी होतंय', असे दिले आहे.  ईडीच्या सूत्रांकडून News18 लोकमतला यासंदर्भात माहिती मिळाली आहे. या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने बहुतांश प्रश्नांची उत्तरे देणे टाळले आणि त्यामुळे शुक्रवारची चौकशी ही जास्त काळ चालली. रिया चक्रवर्तीने ईडीसमोर येण्यास आधी नकार दिला होता. तिने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत ईडीकडे वेळ मागितली होती. मात्र ईडीने तिचे वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांचे अपील फेटाळत तिला मुंबई स्थित कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते.

(हे वाचा-EXCLUSIVE : रियाच्या भावाच्या बँक खात्यावरून महत्त्वाची माहिती आली समोर)

याप्रकरणी ती शुक्रवारी 11 वाजून 45 मिनिटांनी ईडी कार्यालयामध्ये दाखल झाली होती. वडील इंद्रजित चक्रवर्ती आणि भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्याबरोबर ती ईडी कार्यालयामध्ये आली होती. New18 च्या सूत्रांच्या माहितीनुसार, रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीच्या (Showik Chakraborty) खात्यात सुशांतच्या खात्यातून करोडो रुपये ट्रान्सफर झाल्याचं स्पष्ट होत आहे, तशा नोंदी आहेत. कोटक बँकेतून या पैशांचा व्यवहार झाल्याचं या अकाउंट्सवरून स्पष्ट होतं.

'मला कसं तरीच होतंय'- ईडीच्या जवळपास सर्व प्रश्नांवर रियाचे एकच उत्तर

ED : तुम्ही किती कंपन्यांच्या संचालक आहात?

रिया : सर, मला कसं तरीच होतं आहे

ED : तुम्ही किती कंपन्यांच्या संचालक आहात?

रिया : तीन

ED : तुमच्या कंपन्यांचा टॅन नंबर काय?

रिया : मी जाऊ का? मला कसं तरीच होतंय, कारण तुम्ही जे प्रश्न विचारताय त्याची उत्तरे माझ्याकडे नसून माझ्या कंपनी मॅनेजरकडे आहेत

ED : आम्ही 3 कंपन्यांबाबत चौकशी करत आहोत. या तीन कंपन्या काय करायच्या म्हणजे यात कशा प्रकारची कामे केली जायची?

रिया : मला नाही माहित, माझा कंपनी मॅनेजरला विचारा

(हे वाचा-SSR Death : रियाच्या चौकशीनंतर सिद्धार्थ पिठानी, रितेश शहा नोंदवणार ED समोर जबाब)

ED : ज्या कंपन्यांच्या तुम्ही संचालक आहात त्याच कंपन्यामध्ये तुमचे भाऊ, आई आणि वडील हेच संचालक कसे?

रिया : आमची खाजगी कंपनी आहे त्यामुळे संचालक पदी कोणाला ठेवायचे हा आमचा अधिकार आहे

ED : पण, मग सुशांतचा पैसा या कंपन्यांमध्ये लागला होता तर त्याच्या कुटूंबातील एकही सदस्य संचालकपदावर कसा नाही?

रिया : I DON’T KNOW मला नाही माहित, प्लिज मला कसं तरीच होतंय सर!

ED : सुशांतच्या खात्यातून तुमच्या खात्यात आणि तुमच्या खात्यातून तुमच्या भावाच्या खात्यात पैसे वळते झाल्याचे दिसत आहेत?

रिया : हो

ED : कशा करता हे पैसे घेतले होते?

रिया : आता कसं सांगणार शौविक देखील कंपनीच्या संचालक पदावर आहे, कंपनीच्या कामासाठीच पैसे घेतले असतील. मी प्रत्येक पैशांचा हिशोब नाही ठेवत त्या करता माणसे ठेवली आहेत.

ED : सुशांतच्या खात्यातून अनेकवेळा मोठी रक्कम रोख स्वरुपात काढण्यात आली आहे?

रिया : मला नाही माहित याबाबत काही

ED : तुम्ही स्वत: कमावते आहात, तुमचा भाऊ देखील कंपनीच्या संचालकपदी आहे. मग सुशांतचे डेबिट, क्रेडिट आणि इंटरनेट बॅंकिंग तुम्ही का वापरत होता? आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार सुशांतच्या डेबिट, क्रेडिट आणि इंटरनेट बॅंकिंगचा तुम्हीच जास्त वापर करत होता आणि हे सुशांतच्या बॅंक स्टेटमेंट मध्ये पण दिसत आहे?

रिया : मी त्याची प्रेयसी आहे, आमचे नोव्हेंबर मध्ये लग्न होणार होते आणि हे सर्वांना माहित आहे.  त्यामुळे मी हे का करत होते याचे उत्तर तुम्हावा मिळाले असेल.

(हे वाचा-सुशांतच्या डायरीतील पानं कुणी फाडली? महत्त्वाचे पुरावे मिटवल्याचा संशय)

ED : तुमच्या खाजगी टूरचा खर्च देखील सुशांतच्या खात्यातून केला गेला?

रिया : सर मी जाऊ का? कारण मला खरंच कसं तरी होतय. मी या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत

ED : तुम्ही मुंबईतील फ्लॅटस विकत घेण्यासाठी रक्कम कुठून आणली?

रिया : मी कमावलेल्या पैशातून घेतले आहेत.  खारमधील फ्लॅटकरता मी 60 लाख रुपये लोन घेतले आहे आणि 25 लाख रुपये डाऊन पेमेंट केले आहे.

ED : हे फ्लॅटस् विकत घेण्यासाठी सुशांतकडून पैसे घेतले होते?

रिया : नाही

ED : विविडरेज रियालिटी ही कंपनी तुमच्या वडिलांच्या उलवे येथीस फ्लॅटवर रजिस्टर का केली?

रिया : मला नाही माहिती, मी जाऊ का बराच वेळ झाला आहे. मी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि तुम्ही कंपनीबाबत विचारत असेलल्या तांत्रिक प्रश्नांची उत्तरे कंपनी मॅनेजर आपल्याला देईल.  कारण माझी तब्येत बरी नाही आहे. मला कसं तरी होत आहे.

(हे वाचा-सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण: भाजपने केली या परदेशी महिलेच्या चौकशीची मागणी)

अशा प्रकारे अनेक प्रश्नांवर हो किंवा नाही आणि मला कसं तरीच होतय असं सांगुन रिया आठ तास चौकशीला सामोरी गेली आहे. दरम्यान

सुशांतच्या मृत्यूनंतर रियाला मानसिक धक्का बसला आहे. गेली काही दिवस तिच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे रियाची मानसिक स्थिती ढासळली आहे, अशी प्रतिक्रिया तिच्या एका जवळच्या व्यक्तीने दिली आहे. तिच्या शरिरावर या सर्वांचा परिणाम होत असूनही ती ईडी चौकशीला सामोरे गेल्याची माहिती या व्यक्तीने दिली.

रियासह तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, वडील इंद्रजीत चक्रवर्ती आणि सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यांची देखील शुक्रवारी चौकशी झाली. याप्रकरणी रिया, शौविक, इंद्रजीत आणि श्रुती मोदी यांची पुन्हा सोमवारी चौकशी होणार आहे. त्यांना चौकशीसाठी सोमवारी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Sushant Singh Rajput