Home /News /entertainment /

Sushant Singh Rajput: करण जोहरही चौकशीच्या फेऱ्यात, मुंबई पोलीस लवकरच बोलवणार

Sushant Singh Rajput: करण जोहरही चौकशीच्या फेऱ्यात, मुंबई पोलीस लवकरच बोलवणार

बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज लोकांची या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. मात्र करण जोहर यांना आत्तापर्यंत का बोलावण्यात आलं नाही असा सवाल केला जात होता.

    मुंबई 27 जुलै: अभिनेता सुशांत सिंगराजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशीने आता वेग घेतला आहे. या प्रकरणा चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) यांचीही चौकशी होणार आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याचे संकेत दिले आहेत. लवकरच करण जोहर यांना मुंबई पोलीस चौकशीसाठी बोलविणार आहे. या प्रकरणी करण जोहर यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका झाली होती. बॉलिवूडमध्ये दबदबा असलेल्या करण जोहर आणि कंपनीनेच सुशांतचा मानसिक छळ केल्याचा आरोप होत आहे. त्यावरून करण जोहर यांना प्रचंड ट्रोलही करण्यात आलं होतं. करण जोहर यांचा बॉलिवूडमध्ये एक कोंडावळा असून ते त्यांच्या मर्जीनुसारच काम करायला लावतात. जे नवोदित तरुण त्यासाठी तयार नसतात त्यांना कामे मिळू दिली जात नाहीत अशीही टीका होत होती. त्यामुळे सुशांतला नैराश्य आलं होतं. त्याचा मानसिक छळही करण्यात आला होता असाही आरोप आहे. बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज लोकांची या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. मात्र करण जोहर यांना आत्तापर्यंत का बोलावण्यात आलं नाही असा सवाल केला जात होता. मुंबई पोलिसांच्या या निर्णयानंतर आता सगळ्यांचं लक्ष करण जोहर यांच्या चौशीकडे लागणार आहे. सुशांतने मुंबईत वांद्र्यातील राहत्या घरी 14 जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आतापर्यंत 37 जणांचा जबाब पोलिसांनी नोंदवला असल्याचं सांगितलं. आता कंगना रणौत, महेश भट्ट यांनाही आपला जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आला आहे. अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) सातत्याने बॉलिवूडवर विशेषत: दिग्दर्शक करण जोहरवर (karan johar) निशाणा साधत आली आहे. आता करणनंतर तिनं थेट  पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (aaditya Thackeray) यांनाही टार्गेट केलं होतं. करणवरून कंगनाने आदित्य यांना लक्ष्य केलं आहे. बच्चन कुटुंबाकडून खूशखबर! ऐश्वर्या राय आणि आराध्या कोरोनामुक्त सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलसांनी (mumbai police) करण जोहरऐवजी त्याच्या मॅनेजरला चौकशीसाठी समन्स जारी केला आहे. यानंतर कंगना रणौतच्या टीमने ट्वीट केलं आहे. कंगनाच्या टीमने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, "करण जोहरच्या मॅनेजरला समन्स पाठवण्यात आला आहे. मात्र आदित्य ठाकरे यांचा बेस्ट फ्रेंड करण जोहरला नाही. मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतच्या हत्याकांडाच्या तपासाची चेष्टा करणं बंद करा" असं तिने म्हटलं होतं.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Karan Johar, Sushant sing rajput

    पुढील बातम्या