मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुशांत सिह राजपूत मृत्यू प्रकरणात 'मीडिया ट्रायल'; मुंबई हायकोर्टानं दिले महत्त्वाचे आदेश

सुशांत सिह राजपूत मृत्यू प्रकरणात 'मीडिया ट्रायल'; मुंबई हायकोर्टानं दिले महत्त्वाचे आदेश

सुशांत सिंह राजपूत मृत्यू (sushant singh rajput) प्रकरणी मीडिया ट्रायल करून प्रसारमाध्यमांनी नियमांचं उल्लंघन केलं आहे, असं मुंबई हायकोर्टानं म्हटलं आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू (sushant singh rajput) प्रकरणी मीडिया ट्रायल करून प्रसारमाध्यमांनी नियमांचं उल्लंघन केलं आहे, असं मुंबई हायकोर्टानं म्हटलं आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू (sushant singh rajput) प्रकरणी मीडिया ट्रायल करून प्रसारमाध्यमांनी नियमांचं उल्लंघन केलं आहे, असं मुंबई हायकोर्टानं म्हटलं आहे.

मुंबई, 18 जानेवारी : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणात मीडिया ट्रायल (media trial) झालं आहे, प्रसारमाध्यमांनी नियमांचं उल्लंघन केलं आहे, असं मुंबई हायकोर्टानं (Bombay highcourt) म्हटलं आहे. तसंच या प्रकरणात प्रसारमाध्यमांसाठी काही गाईडलाइन्सही कोर्टानं जारी केल्या आहेत.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात  मीडिया ट्रायलविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. मीडियानं केबल टीव्ही नेटवर्क रेग्युलेशन अॅक्टचं उल्लंघन केलं आहे. इतकंच नव्हे तर काही टीव्ही चॅनेल्सनी मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचाही प्रयत्न केला असं कोर्टानं म्हटलं आहे.

तसंच कोर्टानं मृत्यू आणि आत्महत्या प्रकरणी कसं रिपोर्टिंग असावं याबाबत गाइडलाइन्सही जारी केल्या आहेत. घटनेतील क्राईम सिनचं नाट्यरूपांतर करू नये किंवा किंवा संवेदनशील माहिती उघड करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रिंट मीडियानं प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाद्वारे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. असं कोर्टानं सांगितलं आहे.

तसंच  प्रसारमाध्यमांना योग्य आणि आवश्यक ती माहिती देण्यासाठी तपास यंत्रणेनं एक अधिकारी नेमावा. पण त्यांनी कोणत्याही दबावामुळे संवेदनशील माहिती उघड करण्याची गरज नाही, असंही कोर्टानं म्हटलं आहे.

हे वाचा - सैफ अली खान स्टारर वेब सीरीज 'तांडव' विरोधात FIR दाखल;गंभीर आरोपांसह बॅनची मागणी

14, जून 2020 सुशांत आपल्या वांद्रेतील घरात मृतावस्थेत आढळला. या प्रकरणात अद्याप तपास सुरू आहे. या प्रकरणी त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात त्याच्या कुटुंबानं आरोप केले होते. या  सीबीआय, ईडी आणि एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास करताना ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह अनेकांना अटकही करण्यात आली होती.

First published:

Tags: Bollywood, Sushant Singh Rajput, The Bombay High Court