14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील वांद्रे परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेतला होता. सुरुवातील या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला होता. मुंबई पोलिसांनी सुशांतने आत्महत्या केली, असं स्पष्ट केले होते. परंतु, सुशांतने आत्महत्या केली नसून हत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. अखेर हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आणि सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या तपासाला सीबीआयला परवानगी दिली. पण, आता या प्रकरणात एम्सच्या डॉक्टरांनीही सुशांतची हत्या झाली असावी, हे नाकारलं आहे. दरम्यान, या प्रकरणाचा ड्रग्ज अँगलने तपास करणाऱ्या एनसीबीला रियाच्या घरातून दीड किलो ड्रग्ज जप्त केलं आहे. यामध्ये चरस आणि गांजा आहे. यामुळे आता रिया आणि तिचा भाऊ शोविकला 10 ते 20 वर्षे तुरुंगवास होऊ शकतो, अशी माहिती तपास अधिकाऱ्याने दिल्याचं वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे. रिया आणि शोविकच्या घरातून किती ड्रग्ज सापडलं आहे, हे त्यांच्या वकिलांनाही माहिती नाही, असंदेखील या अधिकाऱ्यानं सांगितलं. ड्रग्ज घेतल्याने आणि त्याचा व्यवहार केल्याने रियाला 9 सप्टेंबरला अटक करण्यात आली. 6 ऑक्टोबरपर्यंत तिला न्यायालयीन कोठडी सुनाण्यात आली. तसंच दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचीही चौकशी करण्यात आली आहे.#NewsAlert - Circumstantial evidence of AIIMS Forensic report points at suicide.
Murder angle ruled out from the report.@Runjhunsharmas shares details with @AnushaSoni23.#JusticeForSushant pic.twitter.com/R2ELXlNYoN — CNNNews18 (@CNNnews18) October 3, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.