ED च्या चौकशीत समोर आलं वेगळंच; Ex गर्लफ्रेंडच्या घराचा EMI जात होता सुशांतच्या खात्यातून

ED च्या चौकशीत समोर आलं वेगळंच; Ex गर्लफ्रेंडच्या घराचा EMI जात होता सुशांतच्या खात्यातून

ED ने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात (Rhea Chakraborty) मनी लाँड्रिंगची (Money laundering) केस दाखल केली आहे. रियाच्या चौकशीतून महत्त्वाचे खुलासे झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant singh rajput) सक्तवसुली संचालनालयाने (ED)त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात (Rhea Chakraborty) पैशाची अफरातफर केल्याची (Money laundering) केस दाखल केली आहे. यासंदर्भात रियाची दोन दिवस कसूनच चौकशी झाली. त्यामध्ये महत्त्वाचे खुलासे झाले आहेत.

ED ने केलेल्या चौकशीत रियाकडे असलेल्या मालमत्तेच्या स्रोतांविषयी विचारपूस झाली. पण हे करत असताना वेगळीच माहिती समोर आली आहे. सुशांत त्याच्या Ex गर्लफ्रेंडच्या घराचा हप्ता भरत होता.  हे तिचं घर खरं तर सुशांतच्या पैशातून खरेदी केलेलं असल्याचं समजतं. ते सुशांतच्याच नावावर खरेदी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. या फ्लॅटपोटी दरमहा सुशांत सिंह राजपूतच्या अकाउंटमधूनच बँकेच्या कर्जाचा हप्ता (EMI)जात होता, अशीही माहिती ED च्या चौकशीतून समोर आली आहे. ती एक्स गर्लफ्रेंड अजूनही त्याच घरात राहते, असं समजतं. पण ती नेमकी कोण हे उघड झालेलं नाही. पण अजूनही सुशांतच्या ज्या खात्यातून या घराचे हप्ते फेडले जात होते, त्यात 30 लाखांची रक्कम शिल्लक आहे.

ED ने रिया चक्रवर्तीबरोबरच तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्याविरोधात पैशाच्या अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यासंदर्भात गेले दोन दिवस या सर्वांना समन्स जारी करून चौकशी करण्यात आली. या चौकशीतून आणखीही काही मुद्दे समोर येण्याची शक्यता आहे.

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये (Sushant Singh Rajput Case) सीबीआयनेसुद्धा (CBI) आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामुळे रिया चक्रवर्तीच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. ही केस सीबीआयकडे सोपवण्यात यावी अशी मागणी सुरुवातीला रियानेच केली होती. आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) याचा तिनेच विरोध देखील केला. याप्रकरणातील सत्यता समोर आणली जावी, अशी मागणी वारंवार सुशांतच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे.

दरम्यान सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी कोण करणार- मुंबई पोलीस, बिहार पोलीस की सीबीआय, याबाबत आज देशाचे सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊ शकतं. सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह कीर्ती (Shweta Singh Kirti) हिने एक व्हिडीओ पोस्ट करत पुन्हा एकदा #CBIforSSR ची मागणी केली आहे.

First published: August 13, 2020, 2:41 PM IST

ताज्या बातम्या