मुंबई, 08 सप्टेंबर : अभिनेत्री सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात (Sushant singh rajput case) ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स विभागाने (NCB) रिया चक्रवर्तीला (rhea chakraborty) अटक केली आहे. रियाने आपण ड्रग्ज घेत असल्याची कबुली देताना काही बॉलिवूड सेलिब्रिटींचीदेखील नावं घेतली आहे. दरम्यान आता अभिनेत्री कंगना रणौतची (kangana ranaut) देखील चौकशी केली जाणार आहे.
कंगनाही ड्रग्ज घेते असा आरोप आहे. त्यामुळे कंगना रणौतची याप्रकरणी चौकशी होणार आहे. "कंगना ड्रग्ज घेते, दोन आमदारांनी माझ्याकडे हा मुद्दा मांडला. त्यानंतर मुंबई पोलीस सखोल तपास करतील, असं निवेदन मी विधानसभेत दिलं आहे". अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलातना दिली. दरम्यान कंगनाने माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी कायमची मुंबई सोडून जाईन असं म्हटलं आहे.
I am more than happy to oblige @MumbaiPolice@AnilDeshmukhNCP please do my drug tests investigate my call records if you find any links to drug peddlers ever I will accept my mistake and leave Mumbai forever, looking forward to meet you 🙂 https://t.co/gs3DwcIOvP
कंगनाने ट्वीट केलं आहे की, "मी खूप आनंदी आहे. माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. तुम्हाला कोणत्याही ड्रग्ज डिलरशी माझे संबंध सापडले किंवा मी माझ्या चुकीची कबुली दिली तर मी कायमची मुंबई सोडून जाईन"
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स विभागाने (NCB) रिया चक्रवर्तीला (rhea chakraborty) अनेक तासांच्या चौकशीअंती अटक केली आहे. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यापूर्वीच NCB च्या अटकेत आहेत. रिया आणि तिचा भाऊ शोविक नियमितपणे ड्रग्ज खरेदी करायचे असा आरोप होता. सुशांतसाठी ड्रग्ज घेत असल्याचं शोविकने सांगितलं होतं. आतापर्यंत रिया चक्रवर्तीने आपण कधीच अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही, असं सांगत होती. पण आज सलग तीन दिवसांच्या चौकशीनंतर रियाने प्रथमच ड्रग्ज घेत असल्याची कबुली दिली. इतकचं नाही तर रियाने एनसीबीला ड्रग्स घेतल्या जाणाऱ्या बॉलिवूड पार्ट्यांबाबत माहिती दिली. आता NCB ड्रग्स प्रकरणात सुशांतचे सहकलाकार आणि अभिनेत्यांसह 25 बॉलिवूड कलाकारांना समन्स पाठविणार आहे.
शिवाय कंगनादेखील काही कलाकारांची नावं घेतली होती आणि त्यांनी ड्रग्ज तपासणी करून घ्यावी असं म्हटलं होतं. "रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, विकी कौशल यांना विनंती करते की त्यांनी ड्रग तपासणीसाठी त्यांच्या रक्ताचा नमुना द्या, असे चर्चेत आहे की ते कोकेनच्या आहारी गेले आहेत. त्यांनी या अफवा खोट्या ठरवाव्यात असे मला वाटते. या तरुणांचे सँपल्स क्लीन निघाले तर ते लाखाेंची प्रेरणा ठरतील", असं ट्वीट कंगनाने केलं होतं.