"डिप्रेशनचा धंदा करणाऱ्यांना जनतेनं 'औकात' दाखवली", नाव न घेता कंगनाचा दीपिकावर निशाणा

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूनंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणने (deepika padukone ) डिप्रेशनसंबंधित (depression) एक पोस्ट केली होती, त्यावरून अभिनेत्री कंगना रणौतने (kangana ranaut ) तिला लक्ष्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death Case) सीबीआय (CBI) चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर तो डिप्रेशनमध्ये होता आणि यामुळे त्याने आत्महत्येसारखं पाऊल उचललं अशी चर्चा झाली. दरम्यान सुशांतची आत्महत्या नव्हे तर हत्याच आहे, असा सातत्याने आरोप करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) आता अभिनेत्री दीपिका पादुकोणवरही  (Deepika Padukone)  निशाणा साधला आहे.

कंगना रणौतच्या टीमने एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये कुणाचंही नाव घेतलं नाही. मात्र हे ट्वीट दीपिकाला उद्देशून करण्यात आल्याचं समजतं. ट्वीटमार्फत कंगनाने दीपिकाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

कंगनाने ट्वीट केलं आहे, "माझ्यामागून बोला. डिप्रेशनचा धंदा करणाऱ्यांना जनतेनं 'औकात' दाखवली"

हे वाचा -  "सुशांतच्या नावाने निधी मागताना लाज वाटत नाही", एकता कपूरवर भडकले सुशांतचे चाहते

दीपिकानेदेखील डिप्रेशनचा सामना केला आहे. त्यातून बाहेर पडल्यानंतर तिने मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीची मोहीम हाती घेतली. सुशांतच्या मृत्यूलाही तिनं डिप्रेशनशी जोडलं. सुशांतच्या मृत्यूनंतर दीपिकाने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. दीपिका पोस्टमध्ये म्हणाली होती, "माझ्या मागून बोला, डिप्रेशन, डिप्रेशन म्हणजे दुखी होणं नाही, माझ्या मागून बोला तुम्ही डिप्रेशनपासून कधीच दूर पळू शकत नाही" कंगनानेदेखील आपल्या या ट्वीटमध्ये दीपिकाच्या माझ्या मागून बोला या वाक्याचा उपयोग केला आहे. ज्यावरून तिने हे दीपिकाला उद्देशूनच म्हटल्याचं स्पष्ट होतं.

हे वाचा - सुशांत सिंह राजपूत प्रकरण : 14 जूनला मृत्यू ते CBI तपास; आतापर्यंत काय काय झालं?

दीपिकाने द लिव्ह लव्ह लाइफ फाऊंडेशनची स्थापना केली. ज्या माध्यमातून ती मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करत असते. यासाठी तिला वर्ल्ड एकोनोमिक फोरममध्ये क्रिस्टल अवॉर्डही मिळाला आहे.

Published by: Priya Lad
First published: August 19, 2020, 10:10 PM IST

ताज्या बातम्या