"महेश भट्ट म्हणाले, गप्प राहा नाहीतर तुलाही झोपवेन", जिया खानच्या आईचा खळबळजनक आरोप

जियाच्या (jiah khan) अंत्यसंस्कारादिवशी महेश भट्ट (mahesh bhatt) यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप जियाची आई राबिया खान (rabia khan) यांनी केला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट : आपली मुलगी जिया खानप्रमाणेच (Jiah Khan) अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (sushant singh rajput) हत्या झाली आहे असं म्हणत सुशांत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणी पाठिंबा देणाऱ्या राबिया खान (Rabia Khan) यांनी आता दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. जियाच्या अंत्यसंस्कारादिवशी महेश भट्ट यांनी आपल्याला धमकी दिल्याचं राबिया खान यांनी सांगितलं.

इंडिया टुडेशी बोलताना राबिया खान यांनी दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्यावर खळबळजनक असा आरोप केला आहे.

राबिया म्हणाल्या, "महेश भट्ट जियाच्या अंत्यसंस्कारात आले होते. ते मला म्हणाले की जिया खूप तणावात होती. मी त्यांच्या या म्हणण्याला विरोध केला आणि जिया डिप्रेशनमध्ये नव्हती असं सांगितलं. त्यावर महेश भट्ट यांनी मला तू गप्प राहा नाहीतर तुलाही झोपवेन अशी धमकी दिली. कुणाच्याही अंत्यसंस्काराक असं कोण बोलतं. तिथं आजूबाजूला खूप लोक होते, महेश भट्ट यांचं असं बोलणं ऐकून तेदेखील हैराण झाले"

जिया खानच्या मृत्यूबाबत राबिया म्हणाल्या, "पोलिसांनी मला सांगितलं होतं की आम्ही सूरज पांचोलीला शिक्षा करू शकतो. मी त्यांना म्हटलं की त्याचं बॅकग्राऊंड तपासा तो माझ्या मुलीला मारायचा. मी त्याच्या नार्को टेस्टची मागणी केली मात्र त्यांनी नकार दिला. पोलिसांवर मुव्ही माफियांमार्फत दबाव आणला जात होता. बॉलिवूडचा सुपरस्टार (सलमान खानचा उल्लेख) म्हणाला होतो सूरजची चौकशी करू नका, त्याला एकटं सोडा आम्ही त्याला लाँच करत आहोत"

हे वाचा - जिया खानच्या आईचा #CBIForSSR ला पाठिंबा, म्हणाल्या- माझ्या मुलीप्रमाणे...

"सुशांतनेदेखील आत्महत्या केली नाही त्याची हत्या झाली हे सांगणारी मी पहिली व्यक्ती होते. सुशांत आणि जियाच्या मृत्यूमध्ये एक समानता आहे की दोघांनाही त्यांच्या जोडीदारांनी प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं", असं राबिया म्हणाल्या.

सुशांतला न्याय मिळावा याबाबत भाष्य करणारी पोस्ट राबिया खान यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, "लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण करण्यासाठी हे गुन्हेगार पीडित कुटुंबातील मुलांवर पैशांच्या लालसा, बेजाबदारपणे झालेली वाढ अशाप्रकारे आरोप करून हल्ला करतात. सीबीआयने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करणे गरजेचे आहे आणि अपराध्यांना शिक्षा सुनावली पाहिजे. नाहीतर ते हैवान बनून त्यांचे कुकर्म काही पटींनी वाढेल आणि त्यामुळे आणखी काहींचा बळी जाईल"

हे वाचा - #CBIForSSR नंतर सुशांतच्या चाहत्यांची आणखी एक मोहीम; दाखल केली ऑनलाइन याचिका

"जिया, सुशांत आणि दिशा एखाद्या अपघातामुळे त्यांनी भोगले नाही तर नेते, पोलीस आणि बॉलिवूड माफिया अपराध्यांना सुरक्षा देतात, पीडित परिवाराला भीतीने जगण्यासाठी प्रवृ्त्त करतात, यामुळे त्यांनी भोगले आहे. याप्रकारचे गुन्हे संपायला हवे", राबिया खान यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Published by: Priya Lad
First published: August 14, 2020, 8:58 PM IST

ताज्या बातम्या