गोवा, 27 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीचं (rhea chakraborty) ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे. यामध्ये रियाने तिच्या फोनवरून ज्या व्यक्तींशी मेसेजवरून ड्रग्जबाबत (drugs) चर्चा केली होती. त्यापैकी एक म्हणजे गौरव आर्य (gaurav aarya) आहे. गौरव आर्य हा ड्रग डिलर असून त्याचा आणि रियाचा संपर्क झाला होता, असं सांगितलं जातं आहे. मात्र गौरव आर्यने हे आरोप फेटाळले आहेत. सीएनएन न्यूज 18 ने गौरवशी संपर्क केला.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (Narcotics Control Bureau) म्हणजे NCB ने रिया विरुद्ध FIR दाखल केला आणि त्या दिशेनं तपास सुरू झाला. रियाने ज्या गौरव आर्यशी व्हॉट्सअपवर ड्रग्जबाबत चर्चा केली होती. त्या गौरव आर्यला शोधण्यासाठी एनसीबीची टीम गोव्याला रवाना झाली. गौरव आर्य हा गोव्यातील एका रेस्टॉरंटचा मालक असून अंजुना बीचवर हे रेस्टॉरंट आहे, असं सांगितलं जातं आहे. या रेस्टॉरंटमध्ये एनसीबीची टीम तपास करणार आहे.
#NewsAlert – News18 speaks to Gaurav Arya who is the alleged drug supplier in the case. Says, I knew Rhea only socially and have not received any summons.
Listen in to what he had to tell @Arunima24. #CBIForSushant Tune in to the broadcast with @AnushaSoni23. pic.twitter.com/bIjaLmH63Z — CNNNews18 (@CNNnews18) August 27, 2020
दरम्यान एनसीबी टीम गोव्यातील ज्या रेस्टॉरंटवर तपास करणार आहे, त्या रेस्टॉरंटचा मालक गौरव आर्यशी सीएनएने न्यूज 18 ने संपर्क साधला. त्यावेळी गौरव आर्यने रिया आणि ड्रग्जशी आपला काही संबंध नाही, असं स्पष्ट केलं आहे. 2017 नंतर आपण रिया चक्रवर्तीलाही कधीच भेटला नाही, असं तो म्हणाला. तसंच आपल्याला तपास यंत्रणेकडूनही कोणताही समन्स मिळालेला नसल्याचंही त्याने सांगितलं.
रिया आणि गौरवमध्ये काय चॅट झालं होतं?
पहिले चॅट
'जर आपण हार्ड ड्रग्जबाबत बोललो तर मी जास्त ड्रग्जचा वापर केला नाही आहे, हा मेसेज रियाने 8 मार्च 2017 रोजी गौरवला पाठवला होता.
दुसरे चॅट
दुसऱ्या चॅटमध्ये रियाने गौरवला ' तुझ्याकडे MD आहे का?', असं विचारलं आहे. एमडीचा अर्थ MDMA असा होतो जे खूप स्ट्राँग ड्रग आहे.
हे वाचा - "हा क्लॉस्ट्रोफोबिया आहे?", अंकिताने VIDEO शेअर करत खोडून काढला रियाचा दावा
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तपास संस्था या प्रकरणात चौकशी करत आहेत. सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्ती यांना ड्रग्जचा पुरवठा केला जात होता याचे पुरावे ईडीला मिळाल्याचा दावा एनसीबीने केला. ईडीने एनसीबीला पाठवलेल्या पत्रात ड्रग्जसंदर्भात पुरावे देण्यात आले आहेत. त्यानंतर रियाविरुद्ध कलम 20, 22, 27, 29 NDPS Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sushant Singh Rajput