मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुशांत सिंह राजपूत प्रकरण : ड्रग्ज अँगलच्या तपासात मोठा साक्षीदार सापडला

सुशांत सिंह राजपूत प्रकरण : ड्रग्ज अँगलच्या तपासात मोठा साक्षीदार सापडला

सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपासात आणखी एक मोठा उलगडा झाला आहे.

सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपासात आणखी एक मोठा उलगडा झाला आहे.

सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपासात आणखी एक मोठा उलगडा झाला आहे.

मुंबई, 11 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपासात नार्कोटिक्स विभागाला (NCB) मोठा साक्षीदार सापडला आहे. लॉकडाऊनमध्ये सुशांतच्या घरून रिया चक्रवर्तीचा (rhea chakraborty) घरी ड्रग्जचं कुरिअर पोहोचवणाऱ्या कुरिअर बॉयने या प्रकरणात अटकेत असलेल्या दीपेश सावंत आणि रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला त्याने ओळखलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या कालावधीत एप्रिलमध्ये सुशांतच्या घरून रियाच्या घरी एक कुरिअर पाठवण्यात आलं होतं. दीपेश सावंतने हे कुरिअर दिलं होतं, ज्यामध्ये अर्धा किलो बड्स होते. लॉकडाऊनमध्ये चेकिंगदरम्यान बड्सचं पॅकेट पकडलं जाऊ नये, यासाठी कुरिअरमार्फत पॅकेट मागवण्यात आलं होतं, ज्यामध्ये घरातील काही सामानही ठेवण्यात आलं होतं.

सुशांतच्या घरून रियाच्या घरी कुरिअर पोहोचवणाऱ्या कुरिअर बॉयने दीपेश आणि शोविकला ओळखलंदेखील आहे. शिवाय या कुरिअर बॉयचे फोन डिटेल्सही शोविक आणि दीपेशकडे सापडले आहेत.

हे वाचा - 'तो मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा' साजिद खानवर मॉडेलचा लैंगिक शोषणाचा आरोप

सुशांतची गर्लफ्रेंड रिया आणि तिचा भाऊ शोविक नियमितपणे ड्रग्ज खरेदी करायचे असा आरोप होता. आपण सुशांतसाठी ड्रग्ज घेत होतो असं शोविकने सांगितलं होतं. आतापर्यंत रिया चक्रवर्तीही आपण कधीच अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही असं सांगत आली. अखेर तिनं आपण ड्रग्ज घेत असल्याची कबुली दिली. मात्र अटकेनंतर तिनं आरोप मान्य करायला आपल्यावर दबाव टाकण्यात आला असं सांगितलं. मात्र आता सुशांतच्या घरून रियाच्या घरी ड्रग्जची डिलीव्हरी झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

हे वाचा - ...म्हणून बॉलिवूडचा रियाला पाठिंबा; दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सांगितलं कारण

रिया निर्दोष अजून तिला या प्रकरणात फसवलं जात आहे, असं म्हणत रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सत्र न्यायालयात तिच्या जामिनासाठी दोन वेळा अर्ज केला. मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Sushant Singh Rajput