मुंबई, 26 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant singh rajput) आत्महत्येची सीबीआय (CBI) चौकशी व्हावी याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पत्र लिहिलं होतं. त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) हे पत्र स्वीकारलं आहे.
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आवश्यक तथ्य आणि पुरावे जमा करण्याची जबाबदारी सुब्रमण्यम स्वामी यांनी अधिवक्ता इशकरण सिंह भंडारीला सोपवलं होतं. इशकरण यांनी ट्वीट करून पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) हे पत्र स्वीकारलं आहे, अशी माहिती दिली आहे. इशकरण यांनी हे पत्रदेखील आपल्या ट्वीटसह जोडलं आहे.
PM Modi has acknowledged the letter written by Dr @Swamy39 for CBI investigation into mysterious death of Sushant Singh Rajput!
— Ishkaran Singh Bhandari (@ishkarnBHANDARI) July 25, 2020
This was the letter written by @Swamy39 on 15th July to Hon’ble PM Modi. pic.twitter.com/TKsr0vWKBi
— Ishkaran Singh Bhandari (@ishkarnBHANDARI) July 25, 2020
सुशांतने 14 जूनला मुंबईत वांद्र्यातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. वांद्रे पोलिसांकडून हा तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली जाते आहे. अभिनेता शेखर सुमन, भाजप खासदार रूपा गांगुगी, सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या चाहत्यांनीदेखील अशी मागणी केली आहे.
हे वाचा - ...म्हणून बॉलिवूडमध्ये मला काम मिळत नाही; ऑस्कर विजेता ए.आर.रेहमान यांचा खुलासा
सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूड नेपोटिझम, फिल्म इंडस्ट्रीवर आरोप लावला जातो आहे. अभिनेत्री कंगणा रणौत, शेखर कपूर, अभिनव सिंह कश्यप, कोएन मित्रा, दिग्दर्शक अनुभव सिन्हा, निर्माते निखिल द्विवेदी, हेअर स्टायलिस्ट सपना मोदी भवनानी इतकंच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातून कुस्तीपटू बबीता फोगटनेदेखील यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
हे वाचा - मोठी बातमी! सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी बॉलीवूडमधील बड्या दिग्दर्शकाची चौकशी
मुंबई पोलीस आता हाय प्रोफाइल व्यक्तींची चौकशी करणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांना मुंबई पोलीस लवकरच चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ANI शी बोलताना सांगितलं की, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे. पोलीस लवकरच दिग्दर्शक महेश भट्ट यांना चौकशीसाठी बोलवणार आहेत. तसेच दिग्दर्शक करण जोहरच्या मॅनेजरची देखील चौकशी करण्यात येणार आहे. गरज भासल्यास पोलीस करण जोहर यांना देखील चौकशीसाठी बोलावू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi, PMO office, Subramanyam swani, Sushant Singh Rajput